चेन्नई, 23 एप्रिल : देशाची राजधानी दिल्लीसह देशातील काही भागांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे.
(Coronavirus Infection) आयआयटी मद्रास येथे कोरोनाच्या विस्फोट झाला आहे.
(Covid Cases in IIT Madras) कारण येथे तब्बल 55 नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. राज्याचे आरोग्य सचिव जे राधाकृष्णन यांनी राज्य लसीकरण केंद्रावर पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे सांगितले.
77 टक्के जनतेने घेतलाय दुसरा डोस -
त्यांनी सांगितले की, 1420 जणांपैकी 55 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आयआयटी प्रशासन कॅम्पसमधील विलगीकरण केंद्राचा प्रभावीपणे वापर करत आहेत. तसेच तामिळनाडूमधील फेस मास्क संबंधित नियमांसदर्भात त्यांनी सांगितले की, राज्यात फेस मास्कच्या नियमांना हटवण्यात आलेले नाही. लोकांना अजूनही कोरोनाबाबत सूचित करण्यात येत आहे. राज्यातील 93 टक्के जनतेचे लसीकरण झालेले आहे. मात्र, तरीदेखील जनतेने काळजी घ्यावी, असे आरोग्य प्रशासनाने सांगितले आहे. तर याबरोबरच राज्यात 77 टक्के जनतेला कोरोनाचा लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
जे नागरिक बुस्टर डोससाठी पात्र आहेत, त्यांनी तो घ्यायला हवा. आम्ही मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या निरीक्षणाखाली एक लसीकरणाचा विशेष कार्यक्रम चालवणार आहोत. सोबतच राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी लक्ष देत आहोत.” नुकतेच आम्ही कोरोना प्रतिसाद पॅकेजच्या माध्यमातून 2099 खूपच अद्ययावत उच्च श्रेणीचे आयसीयू बेड्स जोडले आहेत, असेही आरोग्य सचिवांनी सांगितले.
हेही वाचा - मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत 2527 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 33 बाधितांचा मृत्य झाला आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनातून वाचण्यासाठी सावधान राहण तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ञांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.