मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /2024 मध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा, धनंजय मुंडे शरद पवारांसमोर थेट बोलले

2024 मध्ये मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा, धनंजय मुंडे शरद पवारांसमोर थेट बोलले

६४ आमदार असलेल्या पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री झाले. ५४ आमदार असलेले पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री झाले. ४४ आकडा असलेले काँग्रेसचे नेते मंत्री झाले.

६४ आमदार असलेल्या पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री झाले. ५४ आमदार असलेले पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री झाले. ४४ आकडा असलेले काँग्रेसचे नेते मंत्री झाले.

६४ आमदार असलेल्या पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री झाले. ५४ आमदार असलेले पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री झाले. ४४ आकडा असलेले काँग्रेसचे नेते मंत्री झाले.

कोल्हापूर, 23 एप्रिल : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली लढत आहोत. पण, या निवडणुकीत आता आपलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा निर्धार करतो, अशी इच्छाच राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार (sharad pawar) यांच्यासमोर बोलून दाखवली.

राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रेचा कोल्हापूरमध्ये समारोप झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार भाषणं करत भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी दमदार भाषण करून सर्वांची मनं जिंकली.

मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या राज्याने मोठे नाट्य पाहिले. मला आजही तो दिवस आठवतो. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. शिवसेना, भाजप वेगळा लढला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळी लढली. त्यावेळी भाजपला आपण सत्तेत आलो असं वाटतं होतं. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्ष नेत्याला सल्ला दिला होता, ज्यावेळी आमचे आमदार फोडत होता, भाजपने दारं खिडक्या मोकळ्या ठेवल्या होत्या. त्यावेळीस मी सांगितलं, काही पण करायचं, पण पवार साहेबांचा नाद करायचा नाही, असा किस्साच धनंजय मुंडेंनी सांगितला.

(Daily Horoscope : या राशीला उद्या अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा भविष्य)

६४ आमदार असलेल्या पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री झाले. ५४ आमदार असलेले पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री झाले. ४४ आकडा असलेले काँग्रेसचे नेते मंत्री झाले. आणि 105 आमदार असलेले भाजप विरोधात बसले, यालाच होत्याचं नव्हतं आणि नव्हत्यांचं होतं म्हणतात, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

आता एक जणाला तीन वर्षांपूर्वी सल्ला दिला. काही जणाला आता सल्ला द्यावा वाटतो, सांगलीच्या सभेतून देण्याचा प्रयत्न केला. आदरणीय पवार साहेबांवर जातीपातीचा आरोप केला. त्यांच्यासारखे असंख्य असते, ज्याला कुणाला लोकप्रिया मिळवायची असेल तर तो शरद पवार यांच्यावर आरोप करतो, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

('या' अभिनेत्याने अभिनय सोडून सुरू केलं विंडोज बसवून देण्याचे काम, फोटो व्हायरल)

एक काळ येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष होणार आहे. २०२४ ला जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा एकच इच्छा आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे, असा संकल्प आज आपण करूया,  असं धनंजय मुंडे म्हणाले.

First published:
top videos