पाटणा 09 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. बिहारमध्येही असाच राजकीय गेम होणार होता. मात्र, फरक इतकाच राहिला की या परिस्थितीची चाहुल नितीश कुमार यांना आधीच लागली, जी चाहुल लागायला उद्धव ठाकरेंना बराच उशीर झाला. बिहारमधील राजकीय उलथापालथ होण्याचा खेळ समजताच नितीश कुमार यांनी RCP साठी पूर्ण फिल्डिंग लावली. आता याबाबत सविस्तर जाणून घेऊ. (Bihar Politics)
झी न्यूजने याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे. RCP सिंह काही दिवसांपूर्वी नालंदा येथे पोहोचले होते, जिथे 'हमारा मुख्यमंत्री आरसीपी जैसा हो'च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणानंतर जेडीयूने त्यांना घेरण्यास सुरुवात केली. पक्षासाठी ते एकनाथ शिंदे सिद्ध होण्याआधीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटात फुटणार फटाके? 12 आमदार सेनेच्या संपर्कात, राऊतांचा दावा
RCP सिंह यांनी त्यांच्या JDU पक्षाचा राजीनामा दिला, पण आता ही परिस्थिती का आणि कशी तयार झाली ते जाणून घ्या. संपूर्ण स्क्रिप्ट काही महिन्यांपूर्वी लिहिली गेली होती. जोपर्यंत RCP हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत राहिले, तोपर्यंत ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. पण नितीशकुमारांनी RCP यांना 'पॉवर ऑफ अॅटर्नी' देताच ते हाताबाहेर गेले.
ज्यांच्या केंद्र सरकारमध्ये नितीशकुमार संख्याबळाच्या आधारे सामील झाले नाहीत. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर आरसीपींने स्वत:ला पूर्णपणे केंद्रामध्ये सेट करून घेतलं आणि इथूनच नितीश आणि आरसीपी या दोघांचा मार्ग वेगळा झाला.
RCP सिंह मंत्री झाल्यानंतर दिल्लीत गेले, तेव्हा पाटण्यात लालन सिंह आणि उपेंद्र कुशवाह हे नितीशकुमारांचे डोळे आणि कान बनले. अशा परिस्थितीत जेव्हा यूपीच्या निवडणुका आल्या आणि त्यावेळी आरसीपी सिंह यांना भाजपसोबत युती करण्याची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा आरसीपी सिंह अपयशी ठरले. याचा नितीशकुमार यांच्यावर चांगलाच परिणाम झाला. इथे जातीय जनगणना, लोकसंख्या नियंत्रण यावर जेडीयू आणि नितीश यांचं मत सोडून आरसीपी सिंह भाजपची भाषा बोलू लागले. अशा स्थितीत आरसीपी सिंह यांचं वागणं नितीश कुमार यांनी खटकू लागलं.
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराला आता उरले काही तास, 13 नावं झाली फिक्स!
आरसीपी सिंह यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत असताना जेडीयूने त्यांना पुन्हा तिकीट दिले नाही. त्यांच्या जागी झारखंडचे खिरू महतो यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आले. अशा परिस्थितीत कोणत्याही सभागृहाचे सदस्य न होता दीड महिना आरसीपी केंद्रात मंत्री राहिले, पण अखेर त्यांना जुलैमध्ये राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांच्याकडून पाटण्यातील निवासस्थानही ताब्यात घेण्यात आलं. ते मुस्तफापूर येथे त्यांचे वडिलोपार्जित निवासस्थान नालंदा येथे राहू लागले आणि या काळात ते अनेक राजकीय कार्यक्रमांनाही जाऊ लागले.
गुप्त आधारावर नितीश कुमारांपर्यंत ही माहिती पोहोचू लागली की आरसीपी सिंह पक्ष फोडण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, आरसीपी सिंह बिहारमध्ये 'महाराष्ट्रासारखा गेम' करण्याचा विचार करत होते. परंतु गेमचा संपूर्ण कट आधीच लीक झाला आणि 'ऑपरेशन आरसीपी' सुरू झालं. त्याचाच परिणाम म्हणजे जेडीयूने त्यांच्या विरोधात अमाप मालमत्तेची नोटीस बजावली. हे तेच जेडीयू आहे, ज्याचे एकेकाळी आरसीपी सिंह सर्वेसर्वा असायचे आणि त्यांच्या आदेशाशिवाय जेडीयूमध्ये एक पानही हलणार नाही, असं म्हटलं जायचं. मात्र आता जेडीयूनेच त्यांचे पान छाटून त्यांना पूर्णपणे वेगळं केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Nitish kumar