मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराला आता उरले काही तास, 13 नावं झाली फिक्स!

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराला आता उरले काही तास, 13 नावं झाली फिक्स!

 11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे.

11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे.

11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे.

    मुंबई, 09 ऑगस्ट : शिंदे आणि फडणवीस सरकारचा अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसानंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 10 ते 11 आणि एकनाथ शिंदेंसोबत (CM Eknath Shinde) असलेल्या 6-7 मंत्र्यांचे शपथविधी होऊ शकतात. भाजपकडून शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची नावं आता समोर आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, शिवसेना आणि शिंदे गट वाद हा सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. पण, महिना उलटल्यानंतर अखेरीस विस्ताराचा निर्णय घेतला. त्यानुसार, आज मंगळवारी सकाळी 11 वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपकडून 9 जणांना फोन करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे. भाजपच्या या 9 जणांशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. उर्वरीत आमदारांनी कोर्टाच्या निकालानंतर शपथ दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरचं हे पहिलंच मोठं अधिवेशन असणार आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे मात्र निश्चित आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या