Home /News /national /

कर्जाच्या हप्त्यात पुन्हा होणार वाढ; RBI कडून रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ

कर्जाच्या हप्त्यात पुन्हा होणार वाढ; RBI कडून रेपो दरात अर्धा टक्क्यांची वाढ

जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत रेपो दरात ही सलग तिसरी वाढ आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑगस्टमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आज रेपो दरात वाढ केल्याची माहिती दिली.

    नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : सतत वाढत चाललेल्या महागाईमुळे रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी पुन्हा एकदा रेपो दरात (RBI Repo Rate Hike) वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर 5.40 टक्के झाला आहे. मे महिन्यात रेपो दरात अनपेक्षित 40-बेसिस पॉईंट्स आणि जूनमध्ये 50 बेसिस पॉइंट्स वाढ केल्यानंतर आरबीआयने केलेली ही तिसरी वाढ आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने आपल्या घर आणि कार कर्जासारख्या इतर कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ होईल. जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत रेपो दरात ही सलग तिसरी वाढ आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑगस्टमध्ये चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर आज रेपो दरात वाढ केल्याची माहिती दिली. चलनवाढ दशकभराच्या उच्चांकावर आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर जगातील इतर मध्यवर्ती बँकांनी दर वाढवल्यामुळे आरबीआयने मे महिन्यात दर वाढवण्यास सुरुवात केली. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे आणि जूनमध्ये धोरणात्मक दरात एकूण 0.90 टक्क्यांनी वाढ केली. भारतातील किरकोळ महागाई जूनमध्ये सलग सहाव्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6 टक्क्यांच्या टॉलरेंस बँडच्यावर व्यवहार करत आहे. जूनमध्ये किरकोळ महागाई 7.01 टक्क्यांवर आली. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा रेपो दर म्हणजे काय? रेपो रेट म्हणजे ज्यावर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. त्याला रिप्रोडक्शन रेट (Reproduction Rate) म्हणतात. म्हणजेच संक्षिप्तमध्ये त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट कमी म्हणजे बँकेकडून सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होतील. म्हणजेच कमी रेपो रेटमुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज हे सर्व स्वस्त होते. पण, यामुळे तुमच्या ठेवीवरील व्याजदरही वाढतो. त्याचप्रमाणे त्याच्या वाढीमुळे सर्व प्रकारची कर्जे महाग होतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Rbi, Rbi latest news

    पुढील बातम्या