मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Anxiety Relief: ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

Anxiety Relief: ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

आपण आहारात आणि जीवनशैलीत बदल करून चिंता आणि तणाव कमी करू शकतो. येथे आम्ही तुम्हाला यासाठी काही पेयांबद्दल सांगत आहोत, यामुळे आपण स्ट्रेस, चिंता यापासून वाचू शकतो आणि लगेच रिलॅक्स वाटू लागेल.

आपण आहारात आणि जीवनशैलीत बदल करून चिंता आणि तणाव कमी करू शकतो. येथे आम्ही तुम्हाला यासाठी काही पेयांबद्दल सांगत आहोत, यामुळे आपण स्ट्रेस, चिंता यापासून वाचू शकतो आणि लगेच रिलॅक्स वाटू लागेल.

आपण आहारात आणि जीवनशैलीत बदल करून चिंता आणि तणाव कमी करू शकतो. येथे आम्ही तुम्हाला यासाठी काही पेयांबद्दल सांगत आहोत, यामुळे आपण स्ट्रेस, चिंता यापासून वाचू शकतो आणि लगेच रिलॅक्स वाटू लागेल.

नवी दिल्ली, 16 जून : आजच्या वेगवान धावत्या जगात आपण तांत्रिकदृष्ट्या विकसित होत आहोत. परंतु, आपल्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक समस्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. चांगल्या जीवनशैलीच्या शोधात आपली तणाव पातळी नवीन उंचीवर पोहोचली आहे. मेड इंडियाच्या माहितीनुसार, तणाव आणि चिंता टाळण्यासाठी लोक अल्कोहोल किंवा ड्रग्सचा आधार घेत आहेत. हा एक धोकादायक ट्रेंड तर आहेच, परंतु औषधांवर अवलंबून राहण्याशिवाय तुम्हाला औषधांच्या प्रतिकूल परिणामांचा धोकाही आहे. नैसर्गिक मार्गांनी तणाव आणि अस्वस्थता दूर करणे हा सर्वोत्तम मार्ग (Drinks for Anxiety Relief) मानला जातो.

आपण आहारात आणि जीवनशैलीत बदल करून चिंता आणि तणाव कमी करू शकता. येथे आम्ही तुम्हाला यासाठी काही पेयांबद्दल सांगत आहोत, जे तुम्हाला स्ट्रेस, चिंता यापासून वाचवू शकतात आणि तुम्हाला लगेच बरे वाटू लागेल.

कॅमोमाइल चहा -

कॅमोमाइल चहा हा एक अतिशय लोकप्रिय हर्बल चहा आहे जो तणाव, चिंता आणि निद्रानाशावर उपचार करण्यासाठी उपयुक्त असल्याचे ओळखले जाते. मज्जासंस्था शांत करण्यासाठी, स्नायूंना आराम देण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यास याचा फायदा होतो. तयार करण्यासाठी गरम पाण्यात कॅमोमाइलची फुले घाला आणि तीन ते पाच मिनिटे सोडा आणि थंड किंवा कोमट करून प्या.

गरम दूध -

जर तुम्ही रात्री कोमट दूध प्यायला तर दुधात असलेले अमिनो अॅसिड ट्रिप्टोफॅन जे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते आणि फील-गुड हार्मोन सोडण्यास मदत करते. ज्याच्या मदतीने आपल्याला तणाव किंवा चिंता यापासून आराम मिळतो.

हे वाचा - Superfood For Women : वेगवेगळ्या वयोगटानुसार महिलांचा आहार कसा असावा?

चेरी रस -

चेरीमध्ये मेलाटोनिन हा हार्मोन असतो, जो झोपेच्या चक्रांचे नियमन करण्यास मदत करतो. चांगली झोप घेतल्याने आपल्याला तणावापासून आराम मिळतो.

ग्रीन टी -

ग्रीन टीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात जे पेशींचे होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करण्यास मदत करतात आणि आपल्या शरीराची आणि मेंदूची कार्ये सुधारतात. याच्या सेवनाने दुःख, नैराश्य, तणाव, चिंता कमी होते.

हे वाचा -  जेवणाची भांडी, ताट-वाटीचाही आरोग्यावर होतो परिणाम; या गोष्टींकडे दुर्लक्ष नको

ओट स्ट्रॉ ट्री -

ओट स्ट्रॉ हा ओट ब्रानपासून बनवला जातो, जो मानसिक थकवा आणि नैराश्यावर उपचार करण्यासाठी वापरला जातो. चहा म्हणून प्यायल्यास बरे वाटेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Lifestyle, Stress