'देश हम सबको चलाना है...', रतन टाटांनी शेअर केला नव्या मिशनचा हृदयस्पर्शी VIDEO
'देश हम सबको चलाना है...', रतन टाटांनी शेअर केला नव्या मिशनचा हृदयस्पर्शी VIDEO
टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी 2 मिनिटांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. यावर त्यांनी, "मिशन गरिमा आमच्या शूर सफाई कामगारांसाठी", असे कॅप्शन लिहिले आहे.
मुंबई, 19 जानेवारी : रतन टाटा यांनी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ टाटा ट्रस्टच्या मिशन गरिमाचा एक भाग आहे. टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी 2 मिनिटांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. यावर त्यांनी, "मिशन गरिमा आमच्या शूर सफाई कामगारांसाठी", असे कॅप्शन लिहिले आहे. ट्विटरवर ही जाहिरात शेअर करण्यात आल्यानंतर #TwoBinsLifeWins हॅशटॅग व्हायरल होत आहे.
रतन टाटा यांनी शेअर केलेली ही जाहिरात एका शालेय विद्यार्थ्यापासून सुरू होते. यात एक मुलगा वर्गमित्रांना आणि त्यांच्या पालकांना उद्देशून, 'माझे बाबा देश चालवतात', असे म्हणतो. लोकांना समजले नसल्याचे कळताच या चिमुरड्याने सांगितले की ”त्याचे वडील राजकारणी, डॉक्टर, पोलिस किंवा सैन्य सैनिक नाहीत. जर माझे बाबा कामावर गेले नाहीत तर भारतातील प्रत्येक घर थांबेल”. त्यानंतर जाहिरातीमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, एक सफाई कामगार नाल्यामध्ये जाऊन साफसफाई करत आहे. यात मागे एका विद्यार्थी, “कधीकधी असे वाटते की माझे बाबा आजारी पडतील. कधीकधी असे वाटते की माझे बाबा घरी परतणार नाहीत. माझ्या बाबांना वाचवा. माझ्या बाबांकडून हा देश चालवू नका”, असे मन हेलवून टाकणारा संदेश देतो.
वाचा-शाहरुखच्या 'कावेरी अम्मां'चं निधन, आशुतोष गोवारिकरही झाले भावुक
वाचा-दिल्लीच्या तख्तावर शिवजयंती, 12 देशांच्या दूतांनी केला राजांना मानाचा मुजरा
ही हृदयस्पर्शी जाहिरात शेअर करताना रतन टाटा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "मुंबईतील 23 दशलक्ष रहिवाशांच्या शहरात केवळ 50 हजार 000 लोक सफाई कामगार म्हणून काम करतात आणि ते रोज कठीण परिस्थितीत काम करतात. मिशन गरिमा अशाच सफाई कर्मचाऱ्यांसाठी काम करत करतात जे शहरात अकल्पनीय काम करतात”. रतन टाटा यांनी या पोस्टमध्ये स्वच्छता कामगारांवर होणारा भार कमी करण्यासाठी त्यांचा जैववृद्धीकरण आणि बिगर-जैव-वर्गीकरण करण्यायोग्य कचरा वेगळा करावा, असे आवाहन केले आहे. रतन टाटांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाचा-Airtel चा मोठा झटका! खूप महाग झाला स्वस्तातला प्लान, आता येणार जास्त बिल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.