शाहरुखच्या 'कावेरी अम्मां'चं निधन, आशुतोष गोवारिकरही झाले भावुक

शाहरुखच्या 'कावेरी अम्मां'चं निधन, आशुतोष गोवारिकरही झाले भावुक

किशोरी बल्लाळ यांच्या निधनाची माहिती बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारिकर यांनी ट्वीटरवरुन दिली.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांची दिग्गज अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचं वयाच्या 82 वर्षी निधन झालं आहे. त्यांना हिंदी सिनेसृष्टीत शाहरुख खानच्या स्वदेस सिनेमात त्यांनी साकारलेल्या कावेरी अम्माच्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. अभिनेत्री कशोरी बल्लाळ मागच्या काही काळापासून आजरी होत्या आधी बंगळुरूमधील हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण या दरम्यानचं त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

किशोरी बल्लाळ यांच्या निधनाची बातमी बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता आशुतोष गोवारिकर यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन दिली. त्यांनी किशोर यांचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘हृदयद्रावक. किशोरी बल्लाळ यांच्या निधनचं वृत्त ऐकून मी खूप दुःखी आहे. किशोरीजी तुमचं दयाळू, उत्साही आणि प्रेमळ व्यक्तीमत्व नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिल. स्वदेस सिनेमातील तुम्ही साकारलेली कावेरी अम्मा ही व्यक्तिरेखा नेहमीच आमच्या स्मरणात राहिल. तुमची खूप आठवण येईल.’

‘माझ्या नावाचा वापर करणं थांबव नाहीतर...’ नेहानं एक्स बॉयफ्रेंडला दिली ताकीद

आशुतोष गोवारिकर यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावरून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. किशोरी बल्लाळ यांनी 1960 मध्ये त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. बॉलिवूडसोबतच त्यांनी इतर अनेक भाषांच्या सिनेमातही काम केलं आहे. 2004 मध्ये त्यांनी शाहरुख खानच्या स्वदेस सिनेमात कावेरी अम्मांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं खूप कौतुकही झालं होतं. याशिवाय त्यांनी अय्या आणि लफंगे परिंदे या बॉलिवूड सिनेमातही काम केलं होतं.

परिस्थिती भीतीदायक असतानाही लेकीला खळखळून हसवतोय बाप, मन हेलावणारा VIDEO

First published: February 19, 2020, 10:52 AM IST

ताज्या बातम्या