जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'लग्न होणारच होतं पण...', रतन टाटांनी सांगितली त्यांची Love Story

'लग्न होणारच होतं पण...', रतन टाटांनी सांगितली त्यांची Love Story

टाटा ट्रस्ट – केवळ टाटा ट्रस्टचं नाही तर यात जेएन टाटा एंडोमेंट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, लेडी टाटा मेमोरिअल ट्रस्ट, लेडी मेहरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट, जेआरडी आणि थेल्मा जे टाटा ट्रस्ट आदी महत्त्वपूर्ण नावांचा समावेश आहे. या संस्था गेल्या अनेक दशकांपासून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संरक्षण, सामुदायिक विकास आदी क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. टाटा समूह देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून देशाचा विचार करीत होती. त्याचकारणास्तव जमशेद जी टाटा यांनी 1898 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची उभारणी केली. याचा उद्देश विज्ञानातील अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था करणं आहे.

टाटा ट्रस्ट – केवळ टाटा ट्रस्टचं नाही तर यात जेएन टाटा एंडोमेंट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, लेडी टाटा मेमोरिअल ट्रस्ट, लेडी मेहरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट, जेआरडी आणि थेल्मा जे टाटा ट्रस्ट आदी महत्त्वपूर्ण नावांचा समावेश आहे. या संस्था गेल्या अनेक दशकांपासून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, संरक्षण, सामुदायिक विकास आदी क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत. टाटा समूह देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून देशाचा विचार करीत होती. त्याचकारणास्तव जमशेद जी टाटा यांनी 1898 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची उभारणी केली. याचा उद्देश विज्ञानातील अत्याधुनिक शिक्षणाची व्यवस्था करणं आहे.

रतन टाटा यांनी लग्न केले नसले तरी, त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. मात्र एका वेगळ्या कारणामुळं त्यांचा विवाह होऊ शकला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 एप्रिल : भारतातले बडे उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांच्याबाबत नेहमीच विविध बातम्या येत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्याबाबतची एक गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे, ती म्हणजे त्यांच्या प्रेमाबाबतची. रतन टाटा यांनी लग्न केले नसले तरी, त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. ग्रॅज्युएशननंतर लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना त्यांचं लग्न जवळजवळ ठरलंच होतं. रतन टाटा यांनी यावेळी त्यांचं आयुष्य, आईवडिलांचा घटस्फोट, बहिणीच्या सहवासात घालवलेले दिवस, मिळालेले संस्कार, कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण, प्रेम आणि अगदी हे नातं का तुटलं … हे सगळं ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ (Facebook Page Humans of Bombay)या फेसबुक पेजशी शेअर केलं. ही पोस्ट 12 फेब्रुवारी 2020 रोजी शेअर करण्याच आली होती, मात्र सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत रतन टाटांचा पुढाकार, जाहीर केली 500 कोटींची मदत **

News18

**वाचा- ‘देश हम सबको चलाना है…’, रतन टाटांनी शेअर केला नव्या मिशनचा हृदयस्पर्शी VIDEO अशी होती रतन टाटांची लव्ह स्टोरी रतन टाटांनी आर्किटेक्चरमध्ये ग्रॅज्युएशन केलं होतं. रतन टाटांची आवड आर्किटेक्चरमध्ये असल्यामुळे त्यांचे वडीलही काहीकाळ नाराज होते. रतन टाटा यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये नोकरी केली. त्या दिवसांच्या आठवणीत रमताना ते सांगतात, “हवा खूपच छान होती, माझ्याकडे गाडी होती आणि माझं माझ्या नोकरीवरही खूप प्रेम होतं…याच दिवसांत मी एका मुलीच्या प्रेमात पडलो”. रतन टाटा तिच्याशी लग्नही करणार होते पण त्याचवेळी त्यांच्या मोठ्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांना भारतात यावं लागलं. वाचा- …आणि रतन टाटांनी ‘ती’ खंत बोलून दाखवली, म्हणाले… आठवणीत रमले रतन टाटा ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती आपल्यासोबत भारतात येईल, असं रतन टाटांना वाटलं होतं पण त्याचवेळी भारत-चीनचं युद्ध सुरू झालं आणि त्यामुळेच त्या मुलीचे आईबाबा तिला भारतात पाठवायला तयार नव्हते, त्यानंतर हे नातं तुटलं. आपल्याला माहिती आहे की, रतन टाटा यांनी कधीच विवाह केला नाही. टाटा ग्रुप हाच त्यांचा परिवार आहे. आपल्या बालपणाबदद्ल ते म्हणतात, माझं बालपण छान होतं पण आईवडिलांच्या घटस्फोटामुळे मला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. याच दिवसांत त्यांना त्यांच्या आजीने सांभाळलं. माझी आजी उन्हाळ्याच्या सुटीत मला लंडनला घेऊन गेली होती, हेही ते सांगतात. आजीनेच माझ्यावर जीवनाच्या मूल्यांचे संस्कार केले, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात