मुंबई 28 मार्च : ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केलाय. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल 500 कोटींची मदत देणार असल्याचं जाहीर केलं आहे. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असंही रतन टाटांनी म्हटलं आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णांवरचे उपचार, त्यासाठीची औषधं आणि इतर सामुग्री, संशोधन अशा सगळ्याच गोष्टींसाठी या मदतीचा उपयोग करण्यात येणार असल्याचं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. या आधी राहुल बजाज यांच्यासह अनेक उद्योगपतींनी मदत जाहीर केली आहे.
Coronavirus च्या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund स्थापन करण्यात आला आहे. Covid-19 च्या लढाईसाठी बळ म्हणून ज्या नागरिकांना छोट्या -मोठ्या प्रमाणावर दान करायचं आहे त्यांनी PM Cares Fund ला आपलं योगदान द्यावं, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केल्याबरोबर लगेचच बॉलिवूड स्टार अक्षय कुमार पुढे सरसावला आहे. आपण पंतप्रधानांच्या या फंडासाठी माझ्या पुंजीतून 25 कोटींचा निधी देण्याचं वचन देतो, असं Tweet अक्षयने केलं. मोदींनी त्याची लगेच दखल घेत आभार मानले आहेत.
The COVID 19 crisis is one of the toughest challenges we will face as a race. The Tata Trusts and the Tata group companies have in the past risen to the needs of the nation. At this moment, the need of the hour is greater than any other time. pic.twitter.com/y6jzHxUafM
दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 169 वर पोहोचली आहे. त्यात मुंबईत 7 नव्या रुग्णांची भर पडली. तर नागपूरमध्ये 1 जण आढळला आहे. शनिवारी 10 रुग्ण वाढले आहेत. मुंबईतल्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 6 महिला आणि 3 पुरुष दाखल आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.