Home /News /national /

माजी सरंपचाचा मुलगा ब्लॅकमेल करून करायचा बलात्कार, अखेर 'ती'ने गळा दाबून संपवलं!

माजी सरंपचाचा मुलगा ब्लॅकमेल करून करायचा बलात्कार, अखेर 'ती'ने गळा दाबून संपवलं!

या संदर्भात विक्रम उर्फ ​​लाला याच्या कुटुंबीयांनी 18 मे रोजी पहाटे 5 वाजता पोलीस ठाण्यात माहिती दिली होती.

    अलवर (राजस्थान), 8 जून : राजस्थान राज्याच्या अलवर जिल्ह्यातील एका माजी सरपंचाच्या मुलाची हत्या (Murder) झाली होती. 20 दिवसांपूर्वी ही हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान, या हत्येचा खुलासा (Murder mystery) केला आहे. काय आहे प्रकरण? अल्पवयीन बलात्कार पीडितेने (Rape Victim) तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 14 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. माजी सरपंचाचा मुलगा तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करायचा. याला कंटाळून पीडितेने दुपट्टा आणि वायरने त्याचा गळा आवळून खून केला, अशी कबूली पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली. कोटकासिम पोलीस ठाण्याचे अधिकारी महावीर सिंह शेखावत यांनी सांगितले की, शारिरीक अत्याचारामुळे मुलीने विक्रम उर्फ ​​लाला याचा गळा दाबून खून केला. विक्रम हा अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार करायचा, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. 17 मे रोजी रात्रीही त्याने दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. अखेर चिडलेल्या अल्पवयीन मुलाने विक्रमचा दुपट्टा आणि वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून पुरावेही मिटवून टाकले होते. या संदर्भात विक्रम उर्फ ​​लाला याच्या कुटुंबीयांनी 18 मे रोजी पहाटे 5 वाजता पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला. त्यानंतर शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भिवडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल साहू यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीने पोलीस चौकशीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. विक्रम व्यतिरिक्त अल्पवयीन मुलीने इतर लोकांवरही शारीरिक शोषणाचे आरोप केले आहेत. विक्रमसह अनेक जण तिला दररोज ब्लॅकमेल करायचे. त्यांनी त्याला वारंवार चुकीची कामे करण्यास भाग पाडले, असेही पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले. हेही वाचा - वैतागलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य; बॉयफ्रेंडच्या अंगावर 3 वेळा घातली कार, दिला भयानक मृत्यू साहू म्हणाले की, पीडितेला ही बाब कुटुंबीयांना सांगायची होती आणि तिने पोलिसांत तक्रार नोंदवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ती त्यात अयशस्वी ठरली. शेवटी तिने आरोपीला संपविण्याचाच निर्णय घेतला. तिने 17 मे रोजी रात्री 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान जवळच्या शेतात दारूच्या नशेत आलेल्या विक्रमसिंग उर्फ ​​लाला याचा गळा आवळून खून केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Rajasthan, Rape, Sexual harassment

    पुढील बातम्या