अखेर कांदा निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अखेर कांदा निर्यातबंदी उठवली, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा दिला आहे. बाजारपेठांमध्ये कांद्याची वाढती आवक पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी: देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा दिला आहे. बाजारपेठांमध्ये कांद्याची वाढती आवक पाहता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी 'ट्वीट' करून ही माहिती दिली आहे. चार महिन्यांपूर्वी कांद्यावर निर्यातबंदी करण्यात आली होती.

यंदा झालेले बंपर उत्पादन आणि स्थिर बाजारभावामुळे हा निर्णय घेतल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले आहे. सध्या सर्वत्र कांद्याची आवक वाढल्याने भावात मोठी घसरण होत आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून निर्यातबंदी उठविण्याची वारंवार मागणी केली जात होती. 2019 वर्षाच्या मार्च महिन्यात कांद्याची लागवड 28.4 लाख टन झाली होती. त्या तुलनेत यंदा मार्च महिन्यात जवळपास 40 लाख टन कांद्याची लागवड होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

4 सेकंदाच्या YouTube व्हिडीओमुळे जाळ्यात अडकला डॉन; गरबा खेळतानाचं फूटेज पाहून पोलिसांनी ओळखलं

केंद्र सरकारच्या निर्णयाने कांद्याच्या दरवाढीतील पडझड रोखण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, 13 सप्टेंबर 2019 रोजी कांद्यावरील निर्यात मुल्य 850 डॉलरवर पोहोचले होते. त्यानंतर केंद्र सरकारने 29 सप्टेंबर 2019 रोजी कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. जानेवारीनंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून निर्यातबंदी उठवण्यात आली नव्हती. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते. या प्रकरणी राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने याबाबत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती.

टेनिस कोर्टवरची सौंदर्यवती निवृत्त, पाचवेळा ग्रँडस्लॅम विजेती

समितीने दिलेल्या अहवालानंतर..

केंद्र सरकारच्या एका समितीने कांद्याचे दर आणि आवक याबाबत नुकताच आढावा घेतला होता. या समितीने दिलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारने अखेर कांदा निर्यातबंदी उठवल्याचे बोलले जात आहे.

First published: February 26, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या