4 सेकंदाच्या YouTube व्हिडीओमुळे जाळ्यात अडकला डॉन; गरबा खेळतानाचं फूटेज पाहून पोलिसांनी ओळखलं

4 सेकंदाच्या YouTube व्हिडीओमुळे जाळ्यात अडकला डॉन; गरबा खेळतानाचं फूटेज पाहून पोलिसांनी ओळखलं

तब्बल 25 वर्षं भारतीय सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत फरार असणारा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अखेर पोलिसांच्या हाती लागला. 4 सेकंदांच्या एका VIDEO फूटेजमुळे तो RAW आणि पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला, अशी माहिती आता पुढे येत आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : तब्बल 25 वर्षं भारतीय सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देत फरार असणारा अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अखेर पोलिसांच्या हाती लागला. 4 सेकंदांच्या एका VIDEO फूटेजमुळे तो  RAW आणि पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला, अशी माहिती आता पुढे येत आहे.

क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 च्या नवरात्रात हा कुख्यात डॉन सेनेगलमध्ये होता. तिथल्या महाराज हॉटेलमध्ये आयोजित गरबा आणि दांडियाची एक व्हिडीओ क्लिप कुणीतरी YouTube वर अपलोड केली होती. तिथे गेलेले काही भारतीय लोक दांडिया खेळतानाचा हा व्हीडिओ होता. या फुटेजमध्ये रवी पुजारी त्याची पत्नी पद्मासह दांडिया खेळताना दिसला. जेमतेम 4 सेकंद रवी पुजारी या व्हिडीओत दिसला. पण अंडरवर्ल्ड डॉनच्या चेहऱ्याशी साम्य असलेला हा इसम फूटेजमध्ये दिसताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि अखेर भारतीय यंत्रणेच्या हाती हा डॉन लागला.

फक्त 4 सेकंदाच्या फूटेजमध्ये दिसणारी ही व्यक्ती रवी पुजारीच आहे का याचा तपास करण्यासाठी हे व्हिडीओ फूटेज अनेक वेळा स्लो मोशमध्ये पाहिलं गेलं. त्यामध्ये त्याची पत्नी पद्मा हिचा चेहरा पहिल्यांदा ओळखण्यात यश आलं. बनावट पासपोर्ट प्रकरणी तीसुद्धा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होती. अखेर या व्हिडीओतूनच रवी पुजारीचा सुगावा लागला आणि सुरक्षा यंत्रणांना याबद्दल अलर्ट पाठवण्यात आला. रवी पुजारी सेनेगलमध्येच असल्याचं यातून सिद्ध झालं.

वाचा - प्रीती झिंटाचा ‘दिवाना’ होता रवी पुजारी, तिच्यासाठी नडला नेस वाडियाशी

अखेर 23 फेब्रुवारीला अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला भारतात आणण्यास भारतीय तपास यंत्रणांना यश आलं. सोनेगलमधून त्याला  नवी दिल्लीत आणण्यात आलं आणि तेथून थेट बंगळुरूला नेण्यात आलं. RAW च्या मदतीने कर्नाटक पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांनी त्याला पश्चिम आफ्रिकेतल्या सेनेगल इथे अटक केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँथनी फर्नांडिसच्या नावाने बनावट पासपोर्ट बनवून सेनेगलमध्ये राहत होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 रोजी जारी करण्यात आला होता, जो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे.

पासपोर्टनुसार, तो एक व्यावसायिक एजंट आहे. याचा अर्थ असा की, तो इतर देशांमध्ये एक व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. जो सेनेगल, बुर्किना फासो आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये 'नमस्ते इंडिया' नावाचं रेस्टॉरंट चालवितो. भारतीय गुप्तचर संस्था रॉ सध्या रवी पुजारीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

-----------------

अन्य बातम्या

'सविताभाभी तुझा आकार...' अश्लिल उद्योग मित्र मंडळाचा कहर, गाणं आलं समोर VIDEO

व्हॉट्सअॅप ग्रुपवर चिडवत होते मित्र, कॉलेज तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

First published: February 26, 2020, 9:09 PM IST

ताज्या बातम्या