नवी दिल्ली, 16 मे : कृषी कायद्यांविरोधात वर्षभराहून अधिक काळ चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात (Farmers Protest) जर कोणता चेहरा सर्वात जास्त ओळखला गेला असेल तर तो राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांचा. राकेश टिकैत हे शेतकऱ्यांचा मुद्दा सरकार आणि प्रसारमाध्यमांसमोर ठेवण्यात नेहमीच आघाडीवर होते. राकेश टिकैत हे शेतकऱ्यांच्या बाजूने सर्वात मोठा चेहरा म्हणून टीव्ही चॅनेल्सच्या चर्चेत भाग घेत असत. राकेश टिकैत नसते तर आंदोलन कोलमडलं असतं, असं वाटत होतं.
शेतीविषयक कायदे मागे घेतल्यानं एक प्रकारे शेतकऱ्यांचा विजय झाला, असं म्हटलं जात होतं. मग असे काय झालं की, राकेश टिकैत 6 महिन्यातच संघटनेत एकटे पडले. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून मोदी सरकारने (modi government news) राकेश टिकैत यांची कारकीर्द संपवली का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचवेळी टिकैत बंधू हे राजकीय पक्षांचं बाहुलं बनल्याचा आरोपही भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी केला आहे.
भाकियूमध्ये फूट का पडली?
चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्तच्या कार्यक्रमावेळी संघटनेचे दोन तुकडे (Indian Farmers' Union split) झाले. असंतुष्ट गटाने भारतीय किसान युनियन (अराजकीय) या नावाने एक नवीन संघटना स्थापन केली आणि भारतीय किसान युनियनचे उपाध्यक्ष राजेश सिंह यांना या संघटनेचं अध्यक्ष केलं. राकेश टिकैत आणि नरेश टिकैत यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. राकेश टिकैत हे स्वत:साठी राजकीय मैदान तयार करत असून त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, असा आरोप या नव्या संघटनेच्या सदस्यांनी केला आहे.
राकेश टिकैत यांना बंडाची माहिती होती
राकेश टिकैत यांना संघटनेत सुरू असलेल्या गोंधळाची माहिती होती. ते चौधरी महेंद्र सिंह टिकैत यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमापूर्वी लखनौला पोहोचले होते आणि ते असंतुष्ट गटाचे प्रमुख नेते हरिनाम सिंह यांच्या घरी थांबले होते. त्यांनी नेत्यांचं मन वळवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, काहीही उपयोग झाला नाही.
हे वाचा -
विमानप्रवास करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! पायलटच्या या कृतीने हजारो प्रवाशांचे
सरकारविरोधात आघाडी उघडणे आणि निवडणूक असलेल्या राज्यांना भेटी देणे महागात पडले
आंदोलनादरम्यान राकेश टिकैत हेही ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत्या त्या राज्यांमध्ये जात असत. ते भाजपच्या विरोधात उग्रपणे प्रचार करायचे. केंद्राच्या धोरणांना ते वाईट म्हणायचे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या टीएमसीचा विजय झाला, तेव्हा त्याचं श्रेयही राकेश टिकैत यांना देण्यात आलं. मात्र, उत्तर प्रदेशात सर्व सभा घेऊनही भाजपचा विजय झाला. आता ते विरोधी पक्षांसोबत राजकीय खेळ खेळत असल्याचा आरोप संतप्त छावणीने केला. राजेश सिंह मलिक म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांचे भलं होऊ शकत नाही.
हे वाचा -
काँग्रेसमध्ये आता एका कुटुंबाला एकच तिकीट, महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबांचे काय?
आंदोलनादरम्यान त्रास!
शेतकरी आंदोलनात अनेकवेळा हिंसाचारही झाला. 26 जानेवारी 2021 रोजी शेतकऱ्यांच्या रॅलीत गदारोळ झाला होता. यानंतर लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला. त्यावेळी आंदोलन मोडीत निघणार होतं. पण राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी शेतकर्यांना परत येण्यास भाग पाडलं. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या हत्येचा कट रचत असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला. मात्र, आज हिंसाचाराच्या घटनांमुळे खुद्द भारतीय किसान युनियनच्या लोकांनी बंड केलं आहे. त्यातही हिंसाचार चुकीचा असल्याचं म्हटलं गेलं आहे, याची जबाबदारी राकेश टिकैत यांच्यावर असल्याचं अनेकजण सांगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.