Home /News /national /

विमानप्रवास करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! पायलटच्या या कृतीमुळे हजारो प्रवाशांचे जीव टांगणीला

विमानप्रवास करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! पायलटच्या या कृतीमुळे हजारो प्रवाशांचे जीव टांगणीला

DGCAच्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान 42 भारतीय विमानतळांवर कर्तव्यावर असलेले एकूण 84 लोक मद्यधुंद अवस्थेत आढळले. अल्कोहोल चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 54 जण पायलट होते.

    नवी दिल्ली, 15 मे : विमान वाहतूक नियामक DGCA च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान 42 भारतीय विमानतळांवर कर्तव्यावर असलेले एकूण 84 लोक मद्यधुंद (drunk pilots at airport) अवस्थेत आढळले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) आकडेवारीनुसार, 84 कर्मचाऱ्यांपैकी 54 (64 टक्के) पायलट दारूच्या अनिवार्य चाचणीत नशेत असलेल्या अवस्थेत पकडले गेले. ही आकडेवारी पीटीआयला उपलब्ध करून देण्यात आली आहे. अल्कोहोल चाचणीत (alcohol test at airport) अपयशी ठरलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना विमानतळ चालकांनी नियुक्त केले होतं. तर, काहींना विमानतळावर विविध कामं करणाऱ्या इतर कंपन्यांनी नियुक्त केलं होतं. DGCA डेटानुसार, जानेवारी 2021 ते मार्च 2022 दरम्यान अनिवार्य अल्कोहोल चाचणीत अपयशी ठरलेल्या 84 कर्मचाऱ्यांपैकी 54 विमानचालक (पायलट) होते. हे वाचा - त्या बिकट क्षणी मुलाने पुढे येत वाचवला आईचा जीव, जन्मदात्रीला दिलं हे खास 'Gift' DGCA ने सप्टेंबर 2019 मध्ये विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांसाठी BA स्क्रिनिंगचे नियम जारी केले होते. नियमानुसार, संबंधित विमानतळ ऑपरेटरला केवळ त्यांच्या कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर, विमानतळावर काम करणाऱ्या इतर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचीही नियमितपणे दारूसंबंधी तपासणी करावी लागेल. नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी दारूच्या चाचणीदरम्यान प्रथमच मद्यधुंद अवस्थेत आढळला किंवा चाचणी घेण्यास नकार दिला किंवा विमानतळ परिसराच्या बाहेर पडून चाचणी टाळण्याचा प्रयत्न केला, तर त्याला 'ड्युटीवरून काढलं जाईल आणि त्याचा परवाना तीन महिन्यासाठी निलंबित केला जाईल.' हे वाचा - 50 वर्ष सोबत जगले अन्..; पत्नीच्या निधनानंतर 10 मिनिटातच पतीचाही मृत्यू एएआयने पीटीआय-भाषेला सांगितले की, 'जे कर्मचारी दारूच्या नशेत ड्युटीवर येतात, त्यांचा हा प्रकार एएआयमध्ये अजिबात सहन खपवून घेतला जात नाही. संबंधित विमानतळावरील सर्व विभागांचे प्रमुख त्यांचे कर्मचारी आणि कंत्राटी एजन्सीचे कर्मचारी यांना कर्तव्यावर येताना मद्य न पिण्याबाबत जागरूक करतात आणि त्यांना DGCA CAR (नियमन) मध्ये नमूद केलेल्या दंडांबद्दल माहिती देतात.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Airport, Alcohol

    पुढील बातम्या