Home /News /national /

REET परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 6 जागीच ठार, 5 जखमी

REET परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 6 जागीच ठार, 5 जखमी

बायपासवर ट्रॉली आणि एक इको व्हॅनची जोरदार धडक झाली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

    जयपूर, 25 सप्टेंबर: राजस्थानमधील (Rajasthan) जयपूरच्या (Jaipur) चाकसू येथे मोठा (Road Accident)अपघात झाला. येथे बायपासवर ट्रॉली आणि एक इको व्हॅनची जोरदार धडक झाली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी चाकसू पोलीस स्टेशन परिसरातील निमोडिया कट जवळ महामार्गावर हा मोठा अपघात झाला. ज्यात व्हॅन चालकासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 तरुण जखमी झालेत. सर्व मृत आणि जखमी राजस्थान शिक्षक पात्रता चाचणी (REET) साठी जात होते. यावेळी त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे. पोलिसांनी मृतदेह राज्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवले असून जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या जखमींवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. T20 World Cup: हार्दिक पांड्याची टीम इंडियात निवड कशी झाली? माजी क्रिकेटपटूनं विचारला प्रश्न  सर्व तरुण बारां जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी आहेत. हे तरुण REET ची परीक्षा देण्यासाठी व्हॅनमधून जात होते. चाकसूजवळ पोहोचल्यावर व्हॅन ट्रॉलीला धडकली. अपघात इतका जोरदार होता की व्हॅनचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात व्हॅनमधील चालकासह 6 तरुणांचा मृत्यू झाला. तर व्हॅनमधील इतर तरुण जखमी झाले. अपघातातील 5 तरुणांवर MGH रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतांचे आणि जखमींचे नातेवाईक रुग्णालयात येण्यास सुरुवात झाली आहे. रुग्णालयात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. UNGA मध्ये पाकिस्तानला 'करारा जबाब' देणाऱ्या कोण आहेत स्नेहा दुबे? उद्या होणार रीट परीक्षा राजस्थानमध्ये REET परीक्षा 26 सप्टेंबर रोजी होणार आहे. यासाठी सरकार-प्रशासन स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून लाखो उमेदवार यात सहभागी होतील. दूरच्या केंद्रांसाठी, उमेदवार आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. याचदरम्यान चाकसूमध्ये मोठा अपघात झाला आहे. सध्या पोलीस सर्व मृत आणि जखमींची नावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या पत्त्याची माहिती देत ​​आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jaipur, Rajasthan

    पुढील बातम्या