संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत नेमकं काय घडलं? संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत (UNGA) व्हर्च्युअल भाषण करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी काश्मीरचा मुद्दा काढला. अलीकडच्या अनेक भाषणात त्यांनी या मुद्द्यावरून भारतावर टीका केली होती. तशीच त्यांनी या भाषणातही भारतावर टीका केली. हेही वाचा- काश्मीरबाबत वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा 'करारा जबाब' इम्रान खान यांच्या या भाषणावर 'राइट टू रिप्लाय' (Right To Reply) अर्थात प्रतिसादाच्या अधिकाराचा वापर करून भारताच्या प्रतिनिधी स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा पाढा वाचला. 'पाकिस्तानच्या सर्वोच्च नेत्याने माझ्या देशाविरुद्ध खोटे आरोप करण्यासाठी आणि दुष्प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच्या साह्याने ते स्वतःच्या देशातल्या वाईट परिस्थितीवरून जगाचं लक्ष विचलित करू इच्छितात. पाकिस्तानात दहशतवादी (Terrorist) मुक्तपणे फिरतात आणि सर्वसामान्य नागरिक, विशेषतः अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकांवर अत्याचार केले जातात,' असं स्नेहा दुबे म्हणाल्या. हेही वाचा- T20 World Cup: हार्दिक पांड्याची टीम इंडियात निवड कशी झाली? माजी क्रिकेटपटूनं विचारला प्रश्न 'जम्मू-काश्मीर (J & K) आणि लडाखचा (Ladakh) संपूर्ण भाग हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि यापुढेही राहतील. अवैधपणे पाकिस्तानच्या कब्जात असलेल्या भागांचाही यात समावेश आहे. पाकिस्तानने त्यांच्या अवैधरीत्या ताब्यात असलेली सगळी क्षेत्रं तातडीने मुक्त करावीत, असं आवाहन आम्ही करतो,' असंही स्नेहा दुबे यांनी ठासून सांगितलं. 'अनेक देशांना पाकिस्तानचा इतिहास माहितीच आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो, आसरा देतो आणि सक्रिपणे त्यांना पाठिंबा देतो. हीच त्यांची नीती आहे. पाकिस्तान हा असा देश आहे, की जो दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा, त्यांना अर्थसाह्य करणारा आणि त्यांना हत्यारं उपलब्ध करून देणारा देश म्हणून जागतिक पातळीवर ओळखला जातो,' असंही स्नेहा दुबे म्हणाल्या.Member States are aware Pakistan has established history &policy of harbouring, aiding &actively supporting terrorists.This is a country that has been globally recognised as openly supporting, training, financing &arming terrorists as matter of State policy:First Secy Sneha Dubey pic.twitter.com/6nSS3QvaHh
— ANI (@ANI) September 25, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, UNGA