Home /News /sport /

T20 World Cup: हार्दिक पांड्याची टीम इंडियात निवड कशी झाली? माजी क्रिकेटपटूनं विचारला प्रश्न

T20 World Cup: हार्दिक पांड्याची टीम इंडियात निवड कशी झाली? माजी क्रिकेटपटूनं विचारला प्रश्न

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021, phase 2) अजून एकही मॅच खेळलेला नाही.

    मुंबई, 25 सप्टेंबर : मुंबई इंडियन्सचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021, phase 2) अजून एकही मॅच खेळलेला नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला आराम देण्यात आला होता. त्यानंतर हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हार्दिक फिट नसेल तर त्यानं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जावं, असा सल्ला माजी क्रिकेटपटूनं दिला आहे. टीम इंडियाचा माजी विकेट किपर तसंच निवड समितीचा माजी सदस्य सबा करीमनं (Saba Karim) हार्दिकच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'तो मोठा खेळाडू आहे. त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. पण तो फिट आहे का? हा खरा प्रश्न आहे. तो फिट नसेल तर या मुद्याकडं दुर्लक्ष कसं गेलं? तो दुखापतग्रस्त असूनही त्याला टीममध्ये का निवडलं? कोणत्याही क्रिकेटपटूला फिटनेस सिद्ध करण्यासाठी एनसीएमध्ये जावं लागतं. हा नियम सर्वांना लागू आहे.' असं मत सबानं व्यक्त केलं. मुंबई इंडियन्सच्या दिग्गजाला मिळाली नवी जबाबदारी, 'या' टीमला करणार वर्ल्ड कपमध्ये मार्गदर्शन हार्दिक पांड्यासोबत नेमकं काय झालं आहे, हे आपल्याला माहिती नाही, असं त्यानं सांगितलं.  मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियाचा आक्रमक ऑल राऊंडर असलेल्या हार्दिक पांड्याची आगामी टी20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पहिली मॅच 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सबा करीमनं यावेळी इशान किशनच्या निवडीचं समर्थन केलं. आयपीएल स्पर्धेत इशान रन काढण्यासाठी संघर्ष करत आहे, पण त्यानं टीम इंडियाकडून मागील काही मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ही सकारात्मक बाब असल्याचं त्यानं सांगितलं. T20 वर्ल्ड कपची BCCI ला काळजी, IPL टीम्सना पत्र लिहून केली 'हे' आवाहन हार्दिक कधी खेळणार? मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच (Mumbai Indians Bowling coach) शेन बॉन्ड (Shane Bond) यानं हार्दिक आयपीएल स्पर्धेत कधी खेळणार या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 'हार्दिकला मैदानात उतरवण्यासाठी (Waiting to put Pandya back on field) आम्हीही केव्हापासून वाट पाहत आहोत. रोहितप्रमाणेच त्याचंही ट्रेनिंग (Hardik Pandya training well) अगदी चांगलं चाललं आहे आणि लवकरच तो मुंबईकडून मैदानात (Hardik might play soon) खेळताना दिसेल,' असं बॉन्डनं सांगितलं. SCHEDULE TIME TABLE: 'हार्दिकचं फिट असणं मुंबईसाठी आणि टीम इंडियासाठीही गरजेचं आहे. आयपीएलनंतर त्याला टी-20 वर्ल्डकपमध्येही (Hardik Pandya in World cup squad) खेळायचं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊनच त्याच्यावर कमीत कमी ताण कसा येईल हे आम्ही पाहतो आहोत. केवळ हार्दिकच नाही, तर भारतीय क्रिकेट संघातल्या सर्वच खेळाडूंबाबत मुंबई इंडियन्सची (MI) हीच भूमिका आहे.' असं त्यानं स्पष्ट केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या