मराठी बातम्या /बातम्या /देश /वाद झाला पत्नीसोबत पण शिक्षा 17 वर्षांच्या मेहुणीला, भावोजीकडून चार दिवस सतत बलात्कार

वाद झाला पत्नीसोबत पण शिक्षा 17 वर्षांच्या मेहुणीला, भावोजीकडून चार दिवस सतत बलात्कार

पुन्हा एकदा नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे भावोजीवर आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुन्हा एकदा नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे भावोजीवर आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुन्हा एकदा नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे भावोजीवर आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राजस्थान, 28 डिसेंबर: राजस्थानच्या (Rajasthan) कोटा जिल्ह्यातून (Kota District) पुन्हा एकदा नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे भावोजीवर आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रारी दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

त्याचबरोबर पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर केल्यानंतर तिला नारी शाळेत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रकरणानुसार, भावोजीवर आरोप आहे की, त्याने मुलीला 4 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतलं आणि सतत तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा- 'शोले' सिनेमातील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्याचा जगाला अलविदा

या प्रकरणावर बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष कनीज फातमा यांनी सांगितले की, प्रकरण कोटाच्या नयापुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे दीड वर्षापूर्वी आरोपीचे लग्न झालं होतं. आरोपीला दारूचे व्यसन असून तो मोलमजुरी करतो. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनं त्याला सो़डलं आणि विष प्यायली होती.

पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकते

पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्याच्या 17 वर्षीय मेहुणीला कॉलेजमधून गावात घेऊन गेला. दुसरीकडे मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस पीडित मुलीच्या भावोजीच्या घरी पोहोचले. पोलीस घरी पोहोचताच पीडित मुलगी त्याच्या घरी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली.

पीडित मुलगी ही महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. त्यानंतर तिला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले आणि तिची तक्रार ऐकून घेतल्यानंतर तिला महिलाशाळेत पाठवण्यात आले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास नयापुरा पोलीस स्टेशन करत असून आरोपीची चौकशी करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा- '15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काहीही गैर नाही' BJP खासदाराने तोडले अकलेचे तारे, VIDEO व्हायरल

विशेष म्हणजे बलात्काराच्या प्रकरणात कुटुंबातील सदस्याचा सहभाग असणे ही राजस्थानातील नवीन घटना नाही. अनेकदा अशा घटना समोर येतात की बलात्काराच्या घटनेत कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग असतो. त्याच वेळी, अशा प्रकरणांमध्ये बहुतेक प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत.

First published:
top videos

    Tags: Rajasthan, Rape, Rape accussed