मराठी बातम्या /बातम्या /देश /'15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काहीही गैर नाही' BJP खासदाराने तोडले अकलेचे तारे, VIDEO व्हायरल

'15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला तर त्यात काहीही गैर नाही' BJP खासदाराने तोडले अकलेचे तारे, VIDEO व्हायरल

Viral Video: गावातील सरपंचाने जर 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला, तर त्यात काहीही गैर (corruption up to Rs 15 lakhs is totally fine) नाही. 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. असं अजब विधान एका भाजप खासदाने केलं (BJP MP controversial statement) आहे.

पुढे वाचा ...

रीवा, 28 डिसेंबर: गावातील सरपंचाने (Sarpanch) जर 15 लाखांपर्यंत भ्रष्टाचार केला, तर त्यात काहीही गैर नाही (corruption up to Rs 15 lakhs is totally fine). 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. त्यामुळे सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला तर तरच आमच्याकडे तक्रार करा, असं विधान भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने केलं आहे. या वादग्रस्त वक्तव्याचा एका व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित वादग्रस्त विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचं नाव जनार्दन मिश्रा (BJP MP janardan mishra controversial statement) असून ते मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले खासदार आहे. त्यांनी गावपातळीवर सरपंचाकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असून यामध्ये काहीच गैर नसल्याचं म्हटलं आहे. एखाद्या सरपंचाने 15 लाख रुपयांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर मला सांगू नका.

हेही वाचा-Exclusive Video: खुल जा सिम सिम..! पियूष जैननं 'या' कोपऱ्यात लपवला होता खजिना

लाखो रुपये गुंतवून त्यांनं निवडणूक लढलेली असते. पुढील निवडणुकीसाठीही त्यांना पैशांची गरज आहे. त्यामुळे कोणत्याही सरपंचाने 15 लाखांहून अधिकचा भ्रष्टाचार केला तर तो चुकीचा आहे, असं अजब गजब विधान जनार्दन मिश्रा यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले भाजप खासदार?

भाजप खासदार जनार्दन मिश्रा व्हिडीओत म्हणाले की, 'गावातील सरपंचाने भ्रष्टाचार केला, अशी तक्रार घेऊन नागरिक जेव्हा माझ्याकडे येतात, तेव्हा मी त्यांना म्हणतो की, त्यांनी 15 लाखांपर्यंतचा भ्रष्टाचार केला असेल, तर कृपया आमच्याकडे तक्रार करू नका. जर सरपंचाने 15 लाखांपेक्षा अधिक भ्रष्टाचार केला असेल, तर त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो. कारण सरपंचाने निवडणुकीत 7 लाख रुपये गुंतवलेले असतात. तसेच पुढील निवडणुकीसाठी त्याला आणखी 7 लाखांची गरज असते. महागाई वाढली तर आणखी 1 लाख जोडा. त्यामुळे ते 15 लाख रुपयांचा घोळ करत असतील, तर त्याला भ्रष्टाचार म्हणता येणार नाही. हीच समाजाची सद्यस्थिती आहे.'

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh