मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'शोले' सिनेमातील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्याचा जगाला अलविदा, 67 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

'शोले' सिनेमातील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्याचा जगाला अलविदा, 67 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

सिनेमाजगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्यानं वयाच्या 67 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.

सिनेमाजगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्यानं वयाच्या 67 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.

सिनेमाजगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्यानं वयाच्या 67 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे.

मुंबई, 28 डिसेंबर: सिनेमाजगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेता आणि प्रसिद्ध कॉमेडियन (Famous Comedian) मुश्ताक मर्चंट ( Mushtaq Merchant) यांचे निधन झालं आहे. मुश्ताक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. प्रदीर्घ काळापासून मधुमेहाने (Diabetes) त्रस्त असलेल्या मुश्ताक यांनी मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये जगाचा निरोप घेतला आहे.

मुश्ताकने अनेक वर्षांपूर्वी सिने जगताला अलविदा केले होते आणि ते मुंबईतील वांद्रे येथे राहत होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून चाहते अतिशय दु:खी झाले आहेत आणि सोशल मीडियावर दिवंगत अभिनेत्याची आठवण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

शोले सिनेमात केलं काम

दिवंगत अभिनेते मुश्ताक यांनी ‘सीता और गीता’, ‘हाथ की सफाई’, ‘जवानी दीवानी’, ‘शोले’ आणि ‘सागर’ यांसारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाची झलक दाखवली. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र स्टारर 'शोले' या सिनेमात मुश्ताकने एक नाही तर दोन भूमिका केल्या होत्या. IMDb नुसार, सिनेमाच्या प्रसिद्ध गाण्यात 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या गाण्यात मुश्ताक यांनी एका ट्रेन ड्रायव्हरची आणि दुसर्‍या एका व्यक्तीची भूमिका केली होती, ज्याची मोटरसायकल जय आणि वीरूने चोरली होती.

16 वर्षांपूर्वी सिनेसृष्टीला केला निरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुश्ताक यांना मुंबईच्या ऑल इंडिया इंटर कॉलेजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यासोबतच त्यांना लागोपाठ तीन वर्ष सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला आहे. अभिनयासोबतच मुश्ताक यांनी प्यार का साया, लाड साब, सपने साजन के आणि गँग सारख्या काही सिनेमांसाठी पटकथा लिहिल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे मुश्ताक बराच काळ सिनेजगतात सक्रिय नव्हते. मुश्ताक यांनी 16 वर्षांपूर्वी सिनेसृष्टीला अलविदा केला होता.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Bollywood News