जाहिरात
मराठी बातम्या / देश / वेगवान कारच्या धडकेनं पती-पत्नी उडाले हवेत, अपघाताचा Live Video

वेगवान कारच्या धडकेनं पती-पत्नी उडाले हवेत, अपघाताचा Live Video

वेगवान कारच्या धडकेनं पती-पत्नी उडाले हवेत, अपघाताचा Live Video

ताज्या घटनेत शहरातील रातानाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खास बाग परिसरातील एक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जोधपूर, 21 नोव्हेंबर: राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) वेगवान वाहनांचा कहर पाहायला मिळाला आहे. भरधाव वेगामुळे रस्त्यांवर होणारे अपघात थांबण्याचे नाव घेत नाहीत. ताज्या घटनेत शहरातील रातानाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खास बाग परिसरातील एक प्रकार समोर आला आहे. जिथे दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. रस्त्यावर पडलेल्या पती-पत्नीला मदत करण्याऐवजी कार चालकानं कार मागे वळवून घटनास्थळावरून थेट पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (Accident Video)समोर आले असून ते हृदय हेलावून टाकणारे आहे. ही घटना पाच दिवसांपूर्वीची आहे. आता या अपघातात जखमी झालेले चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी रेखा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रशेखर हे रात्री पत्नी रेखासोबत दुचाकीवरून जात होते. त्याच्या पुढे दुसरी कारही होती. पाठीमागून भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं दुचाकीला धडक दिली. कारची धडक बसताच पती-पत्नी हवेत उडून रस्त्यावर पडले. अपघातानंतर कार चालकानं काढला पळ या अपघातानंतर लगेचच कार चालक काही क्षण थांबला, मात्र त्यानंतर वेगानं कार मागे घेऊन तेथून पळ काढला. त्यानंतर तेथून बाहेर पडलेल्या एका प्रवाशानं दोन्ही जखमींना हाताळले. तोपर्यंत इतर लोकही तेथे पोहोचले. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. हेही वाचा-  Terrible! नाराज Girlfriend ने Boyfriend वर केला अ‍ॅसिड हल्ला चार दिवसांच्या उपचारानंतर आता दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. यानंतर कुटुंबीयांनी अपघातस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पोलिसांत गुन्हा दाखल केला. आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडी मालकाचा शोध घेत आहेत. हेही वाचा-  मोठी बातमी: वेस्ट इंडिजच्या खेळाडूला गंभीर दुखापत, स्ट्रेचरने नेलं मैदानाच्या बाहेर, LIVE VIDEO जोधपूरमध्ये वेग अधिक असल्यानं बेकायदा गाड्यांमुळे अपघातात सातत्याने वाढ होत आहे. एकापाठोपाठ एक असे वारंवार अपघात होत असतानाही ना लोकांनी धडा घेतला, पोलिसांना गाड्यांच्या वेगावर अंकुश ठेवता आला. दोन दिवसांपूर्वी शहरातील चौपास्नी गृहनिर्माण मंडळात पहाटे तीन वाजता एका अनियंत्रित कारनं अनेक विद्युत खांब उडवले. सुदैवानं पहाटे तीन वाजता रस्त्यावर वाहतूक कमी होते. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याचवेळी, दोन ऑडी कारच्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 12 जण जखमी झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rajasthan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात