• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ब्रेकअप झाल्याच्या रागात Girlfriend ने केला अ‍ॅसिड हल्ला, Boyfriend चा एक डोळा निकामी

ब्रेकअप झाल्याच्या रागात Girlfriend ने केला अ‍ॅसिड हल्ला, Boyfriend चा एक डोळा निकामी

आदिमाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिबाला ताब्यात घेतलं आहे.

 • Share this:
  केरळ, 21 नोव्हेंबर: केरळमधील (Kerala) इडुक्की जिल्ह्यातील आदिमाली येथे एक धक्कादायक (shocking incident)घटना समोर आली आहे. इडुक्की येथील एका तरुणाचे गर्लफ्रेंडसोबत (girlfriend) ब्रेकअप (breakup) झालं होतं. ब्रेकअपमुळे नाराज झालेल्या गर्लफ्रेंडनं तरुणावर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत तरुणाच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. तिरुअनंतपुरम येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 16 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. आरोपानुसार, तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पूजापुरा येथील रहिवासी अरुण कुमार यांच्यावर आदिमाली इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 35 वर्षीय शिबानं अ‍ॅसिड हल्ला केला. अ‍ॅसिड हल्ल्यात अरुण कुमार यांना एक डोळा गमवावा लागला. शिबा अरुण कुमारची गर्लफ्रेंड होती. त्यांचं ब्रेकअप झालं आणि त्याच गोष्टीचा तिला राग आला होता. हेही वाचा- अनिल कुंबळेच्याही पुढे गेला आफ्रिकन ऑल राऊंडर, एका इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स आणि काढले 111 रन अरुण कुमार आणि शिबा यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघं प्रेमात पडले. पण काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. अरुण कुमारनं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानं शिबा नाराज होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोष्टीचा शीबाला इतका राग आला की तिनं एवढं मोठं वाईट कृत्य केलं आहे. मंगळवारी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास अरुण कुमार यांना आदिमाली इरुम्पुपालम ख्रिश्चन चर्चमध्ये बोलावण्यात आले. शिबानं अरुणच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. अ‍ॅसिड फेकताना शिंतोडे उडल्यानं शीबाचा चेहरा आणि हातही भाजले आहेत. हेही वाचा- Video: अनुष्का रंजनच्या संगीतमध्ये  Alia Bhattचा जबरदस्त Dance, रंगवली मैफिल या घटनेचा व्हिडिओ फुटेजही समोर आलं आहे. आदिमाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून शिबाला ताब्यात घेतलं आहे. अरुणवर तिरुअनंतपुरम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: