मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मोठी बातमी: वेस्ट इंडिजच्या खेळाडूला गंभीर दुखापत, स्ट्रेचरने नेलं मैदानाच्या बाहेर, LIVE VIDEO

मोठी बातमी: वेस्ट इंडिजच्या खेळाडूला गंभीर दुखापत, स्ट्रेचरने नेलं मैदानाच्या बाहेर, LIVE VIDEO

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) यांच्यातील पहिली टेस्ट गॉलमध्ये सुरू झाली आहे. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी एक गंभीर अपघात घडला आहे.

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) यांच्यातील पहिली टेस्ट गॉलमध्ये सुरू झाली आहे. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी एक गंभीर अपघात घडला आहे.

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) यांच्यातील पहिली टेस्ट गॉलमध्ये सुरू झाली आहे. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी एक गंभीर अपघात घडला आहे.

मुंबई, 21 नोव्हेंबर: श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) यांच्यातील पहिली टेस्ट गॉलमध्ये सुरू झाली आहे. या टेस्टच्या पहिल्याच दिवशी एक गंभीर अपघात घडला आहे. या टेस्टमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगला फिल्डिंग करणारा वेस्ट इंडिजचा खेळाडू गंभीर जखमी झाला. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं. त्यानंतर तातडीनं रूग्णवाहिकेतून (Ambulance) हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

वेस्ट इंडिजच्या या 26 वर्षांच्या क्रिकेटपटूचं नाव जेरमी सोलोजानो (Jeremy Solozano) आहे. त्यानं याच टेस्टमध्ये पदार्पण केले. जेरमीला पहिल्याच टेस्टमध्ये मैदानातून सरळ हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. फॉरवर्ड शॉर्टलेगला फिल्डिंग करत असलेल्या जेरमीच्या हेल्मेटला बॉल लागला. त्यामुळे तो मैदानातच पडला. त्यानंतर मेडिकल स्टाफनं त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाच्या बाहेर नेलं. त्यानंतर रूग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

जेरमीच्या दुखापतीचे हॉस्पिटलमधील उपाचारानंतरच नेमकं स्वरूप समजणार आहे. जेरमी लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं केली आहे.

कसा घडला प्रकार?

श्रीलंकेच्या इनिंगमधील 24 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर दिमूथ करुणारत्नेनं मारलेला बॉल थेट जेरमीच्या हेल्मेटला आदळला. जेरमी त्यामुळे मैदानात पडला. तो बॉल हेल्मेटच्या ग्रीलला लागला होता. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू जेरमीजवळ जमा झाले होते.

टी20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर श्रीलंकेची टीम सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज दोन टेस्ट खेळणार आहे.

अनिल कुंबळेच्याही पुढे गेला आफ्रिकन ऑल राऊंडर, एका इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स आणि...

First published:

Tags: Sri lanka, West indies