मराठी बातम्या /बातम्या /देश /

परीक्षा देऊन घरी येत होती तरुणी, संध्याकाळी फोनवर वडिलांना मिळाली वेदनादायक बातमी

परीक्षा देऊन घरी येत होती तरुणी, संध्याकाळी फोनवर वडिलांना मिळाली वेदनादायक बातमी

ही तरुणी अलवरची रहिवासी असून सध्या दौसा येथे राहत होती. त्याच्या वडिलांनी जयपूरमधील खोनागोरियान पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाविरुद्ध नामनिर्देशित तक्रार दाखल केली आहे.

ही तरुणी अलवरची रहिवासी असून सध्या दौसा येथे राहत होती. त्याच्या वडिलांनी जयपूरमधील खोनागोरियान पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाविरुद्ध नामनिर्देशित तक्रार दाखल केली आहे.

ही तरुणी अलवरची रहिवासी असून सध्या दौसा येथे राहत होती. त्याच्या वडिलांनी जयपूरमधील खोनागोरियान पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाविरुद्ध नामनिर्देशित तक्रार दाखल केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

जयपूर, 01 जानेवारी: राजस्थानमधील (Rajasthan)दौसा (Dausa) येथून ग्राम विकास अधिकारी (VDO)भरती परीक्षेसाठी जयपूरला आलेल्या तरुणीची हत्या (Murder) झाल्याची घटना समोर आली आहे. ही तरुणी अलवरची रहिवासी असून सध्या दौसा येथे राहत होती. त्याच्या वडिलांनी जयपूरमधील खोनागोरियान पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाविरुद्ध नामनिर्देशित तक्रार दाखल केली आहे.

आरोप करण्यात आलेला तरुण हा अलवर (Alwar)चा रहिवासी असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. तिथून त्यानं मृत मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली होती. आता या तरुणानं जयपूरपर्यंत परीक्षा देण्यासाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करून तिची हत्या केली.

हेही वाचा- विराट कोहली खोटं बोलला? गांगुलीनंतर निवड समितीनंही फेटाळला 'तो' दावा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीकुई (दौसा) येथील हरिपुरा रोड येथील रहिवासी 22 वर्षीय हेमलता मीणा 27 आणि 28 डिसेंबर रोजी जयपूर येथील VDO परीक्षेसाठी बांदीकुईहून जयपूरला आली होती. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी पेपर संपल्यानंतर हेमलताने वडील लखमीलाल यांना फोन करून संध्याकाळी पॅसेंजर ट्रेनने दौसाला पोहोचणार असल्याचं सांगितलं.आता जगतपुरा येथील रेल्वे स्थानकावर जात असल्याचं तिनं फोनवर म्हटलं. पण रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही.

हेमलताच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा

रात्री आठ वाजता लखमीलाल यांनी हेमलता यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिचा मोबाईल बंद होता. रात्री उशिरा त्यांना जयपूरच्या जेएनयू रुग्णालयातून फोन आला की त्यांची मुलगी गंभीर अवस्थेत दाखल झाली आहे. ते जयपूरला पोहोचले, पण तोपर्यंत हेमलताचा मृत्यू झाला होता.

वडिलांच्या म्हणण्यानुसार, हेमलताच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. तिची पर्स, मोबाईल फोन आणि इतर कागदपत्रे झुडपात सापडली. हॉस्पिटलमधील लोकांनी सांगितलं की, दोन-तीन तरुणांनी हेमलताला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि निघून गेले.

वडिलांनी केला गंभीर आरोप

तिथेही तो गेला आणि त्रास देऊ लागला. सोनूने त्याच्या साथीदारांसह आपल्या मुलीचा जयपूरपर्यंत पाठलाग करून खून केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. पोलीस आता सोनूचा शोध घेत आहेत. त्याची चौकशी केल्यानंतरच संपूर्ण प्रकरण बाहेर येईल. यासोबतच लखमीलाल यांनी सोनू नावाच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे की, त्यांची मुलगी पूर्वी अलवरच्या रैनी येथे आमच्यासोबत राहत होती. सोनू हाही तिथलाच रहिवासी आहे. तो आपल्या मुलीला खूप दिवसांपासून त्रास देत होता. त्यानंतर मुलीला दौसा येथे पाठवण्यात आले.

हेही वाचा- वर्षाच्या पहिल्या दिवशी वाईट बातमी,  वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू 

आता परीक्षा केंद्र आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. पोलीस स्टेशन प्रभारी मनोहरलाल या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Jaipur, Rajasthan