श्रीनगर, 01 जानेवारी: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) नववर्षादरम्यान वैष्णोदेवी मंदिर (Vaishnodevi temple) परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी (devotees) झाल्याची माहिती आहे. यात 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर 20 हून अधिक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मदत आणि बचावकार्य सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत सुमारे 20 जणांना रेस्क्यू केलं आहे.
#UPDATE | Visuals from Naraina hospital where injured devotees have been taken for treatment after the stampede at Mata Vaishno Devi Shrine in Katra. pic.twitter.com/JIb7ZW8TJB
— ANI (@ANI) January 1, 2022
शनिवारी सकाळी शहरात चेंगराचेंगरी होऊन 20 जण जखमी झाले. त्याचवेळी 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 20 जण जखमी झाले आहेत. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितले की, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोक जखमी झाल्याचे वृत्त असून सध्या बचावकार्य सुरू आहे. चेंगराचेंगरीनंतर प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.
Injuries reported in a stampede at Mata Vaishno Devi Bhawan in Katra. Rescue operation underway: Police Control Room, Reasi pic.twitter.com/ex6vumreAF
— ANI (@ANI) January 1, 2022
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कटरा येथील रुग्णालयातील बीएमओ डॉक्टर गोपाल दत्त यांनी सांगितले की, आम्हाला सध्या 6 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमच्याकडे अद्याप पूर्ण तपशील नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir