देश अनलॉक होत असताना या राज्याने जाहीर केली संचारबंदी, 11 जिल्हे राहणार बंद

देश अनलॉक होत असताना या राज्याने जाहीर केली संचारबंदी, 11 जिल्हे राहणार बंद

कोरोनाचा व्हायरसचा वाढता धोका रोखण्यासाठी 11 जिल्ह्यांमध्ये आणि सार्वजनिक स्थळांवर कलम-144 लागू करण्यात आला आहे.

  • Share this:

जयपूर, 20 सप्टेंबर : रोजच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे देशात कोरोनाचा (Coronavirus) धोकाही वाढला आहे. अशात राज्यपातळीवरही कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरतो आहे. या जीवघेण्या रोगाला रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण आता देश अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. अशात राजस्थान सरकारने (Rajasthan Govt.) मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा व्हायरसचा वाढता धोका रोखण्यासाठी 11 जिल्ह्यांमध्ये आणि सार्वजनिक स्थळांवर कलम-144 लागू करण्यात आला आहे.

इतकंच नाही तर 5 पेक्षा जास्त कोणीही एकत्र उभं राहणार नाही, गर्दी करणार नाही अशा कडक सुचना राज्यात देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्च स्तरीय बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सुशांतची आत्महत्या की हत्या? आज एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनंतर होणार खुलासा

कोविड -19च्या संसर्गाची गंभीर स्थिती पाहता जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, अलवर, भिलवाडा, बिकानेर, उदयपूर, सीकर, पाली आणि नागौर जिल्ह्यात आणि सार्वजनिक ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आला आहे. 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक असेल.

आरक्षणासंदर्भात योगी सरकारनं दिली Good News, आता एवढ्या जागा असणार रिझर्व

गहलोत यांनी शनिवारी राज्यात कोविड-19 संसर्गाची सध्याची स्थिती आणि संसर्गाचा धोका कमी करण्याच्या मुद्द्यावर विशेष अधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर राज्यात होणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ही बंदी असणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कारासाठी 20 तर लग्न सोहळ्यासाठी 50 व्यक्तिंच्या उपस्थितीलाच परवाणगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी देखील स्थानिक अधिकाऱ्यांची मान्यता घेणं आणि नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 20, 2020, 9:53 AM IST

ताज्या बातम्या