SSR Case: सुशांतची आत्महत्या की हत्या? आज एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनंतर होणार मोठा खुलासा

SSR Case: सुशांतची आत्महत्या की हत्या? आज एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनंतर होणार मोठा खुलासा

गेल्या आठवड्यात दिल्ली एम्सच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने मुंबईत सुशांतच्या घरी भेट देण्यासाठी आले होते.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येच्या रहस्याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याचा खून करण्यात आला होता? यावर, दिल्लीस्थित अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS) ची फॉरेन्सिक टीम आज CBI कडे आपला अहवाल सादर करणार आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली एम्सच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने मुंबईत सुशांतच्या घरी भेट देण्यासाठी आले होते. यावेळी सीबीआयसमवेत दिल्ली एम्सच्या तीन सदस्यांच्या डॉक्टरांच्या पथकाला सगळे पुरावे गोळा केल्याची माहिती समोर आली होती.

एम्सचे फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, मेडिकल बोर्डाच्या बैठकीनंतर या प्रकरणाचा अहवाल सीबीआयकडे देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. कोणताही गोंधळ न करता आणि कुठलीही शंका न ठेवता तपास सुरू आहे. त्यातूनच अंतिम निष्कर्ष होईल असंही ते म्हणाले.

आरक्षणासंदर्भात योगी सरकारनं दिली Good News, आता एवढ्या जागा असणार रिझर्व

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. रिया चक्रवर्तीने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिग्गजांची ड्रग्ज प्रकरणात नावं पुढे आली आहेत. यामुळे सलमान खान (Salman khan), करण जोहरसह (Karan johar) 8 मोठ्या सेलेब्रिटींना 7 ऑक्टोबरला कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. मुझफ्फरपूर (muzaffarpur) जिल्हा कोर्टाने हा आदेश दिला आहे. या 8 जणांमध्ये अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर बड्या असामींचा समावेश आहे. या सगळ्यांविरोधात इथळ्या न्यायालयात एका वकिलाने याचिका दाखल केली. त्याच्या सुनावणीदरम्याने कोर्टाने या सेलेब्रिटींना नोटिसा बजावल्या आहेत.

'पुणेकरांनी असा पाऊस आणि अशी ढगफुटी कधीही पाहिली नाही'

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी CBI तपास करत आहे. या प्रकरणात ड्रग्ज रॅकेट असल्याचंही उघड झाल्याने नार्कोटिक्स विभागही स्वतंत्रपणे चौकशी करत आहे.

शुक्रवारी NCB च्या टीमने या प्रकरणी एक मोठा ड्रग पेडलर ताब्यात घेतला. राहिल विश्राम नावाचा हा ड्रग पेडलरच्या चौकशीतून 1 किलो ड्रग्जच्या साठ्याचा तपास लागला आहे. याची किंमत 3 ते 4 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं समजतं. राहिलच्या घरातून साडेचार लाखाची रोख रक्कमसुद्धा NCB ला सापडली आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी राहिलशी संपर्कात होत्या. राहिल अनेक बॉलिवूड पार्ट्यांनाही हजर असायचा अशी माहिती आहे.

NCB ने आतापर्यंत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि इतर काही ड्रग माफियांना अटक केली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 20, 2020, 9:17 AM IST

ताज्या बातम्या