अबूरोड (राजस्थान), 18 जून : घरात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र राजस्थानमधील अबूरोड येथे एक धक्कादायक प्रकरणं समोर आलं आहे. इथं एका वडिलांनी आपल्या मुलाच्या मृतहेदावर 21 महिने झाले तरी अंत्यसंस्कार केलेले नाहीत. या मृतहेदाचा सांगाडा त्यांनी घरात जपून ठेवला आहे. पोलिसांनी सामान्य मृत्यू म्हणून या खटल्याची फाइल बंद केली आहे, मात्र आपल्या मुलाची हत्या झाल्याचे या बाबांचे म्हणणे आहे. त्यामुळं त्यांनी मुलाच्या हत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तीला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचं सांगितलं.
हे प्रकरण राजस्थानमधील आबूरोड जामरू गावातील आहे. येथे राहणाऱ्या हगराभाई यांनी 21 महिन्यांपासून आपल्या मुलाचा सांगाडा घरात ठेवला आहे. वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांचा मुलगा नातूभाई 27 ऑगस्ट 2018 रोजी घराबाहेर पडले. त्याचा मृतदेह 5 सप्टेंबर 2018 रोजी गावाबाहेरील रस्त्यावर सापडला. दरम्यान पोलिसांनी याला नैसर्गिक मृत्यू म्हटले असले तरी हगराभाई यांनी त्याच्या मुलाची हत्या झाल्याचे म्हटलं आहे.
वाचा-‘माझं लग्न थांबवा’, पोलिसाच्या मुलीनं थेट पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना केली विनंती
हगराभाई यांनी काही संशयितांविरोधात हदाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी सामान्य मृत्यू म्हणून या केसची फाइल बंद केली होती. पोलीस तपासावर खूश नसलेल्या हगराभाई यांनी जोपर्यंत मुलाला न्याय मिळत नाही, तोपर्यत त्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितले. त्यांनी 21 महिन्यांपासून आपल्या घरातील शौचालयात मुलाचा सांगाडा बांधून ठेवला आहे.
वाचा-...नाहीतर विष घे! रागात पत्नी बोलली आणि तरुणानं खरंच केली आत्महत्या
‘पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये खून असल्याचं आढळून आलं नाही'
हदाडचे पीएसआय महावीरसिंग जडेजा यांनी सांगितले की, हे प्रकरण 2018चे आहे. तेव्हा पीएसआय होते डीआर पारगी. त्याने तपास केला होता. यानंतर मी पोलिस अधिकारी झाले. मी हे प्रकरण देखील पाहिले. मृतदेहावर अहमदाबादमध्ये पोस्टमार्टम करण्यात आला. पोस्टमार्टममध्ये हा खून असल्याचे आढळले नाही.
शेतात सडलेल्या अवस्थेत मिळाला होता मृतदेह
नातू भाई 27 ऑगस्ट रोजी काकांसोबत घराबाहेर पडले. काका घरी आले, पण नातूभाऊ आले नाहीत. चौकशी केली असता त्यांचा मृतदेह 5 सप्टेंबर रोजी मकाईच्या शेतात आढळला. काकांनी दिलेल्या जबाबात, त्यांनी काही लोकांसोबत दारू पार्टी देखील केली आहे. तो परत आला होता, पण त्यांचा पुतण्या नातूभाई तिथेच राहिला.
वाचा-धक्कादायक! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची आत्महत्या, 'या' कारणासाठी संपवलं आयुष्य
संपादन-प्रियांका गावडे.