जाहिरात
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची आत्महत्या, 'या' कारणासाठी संपवलं आयुष्य

धक्कादायक! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची आत्महत्या, 'या' कारणासाठी संपवलं आयुष्य

धक्कादायक! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची आत्महत्या, 'या' कारणासाठी संपवलं आयुष्य

नदीत उडी घेऊन आयुष्य संपवलं आहे. पोलिसांना या प्रकरणी सुसाईड नोट मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुरैना, 18 जून : त्रासाला कंटाळून भाजपच्या एक वरिष्ठ नेत्यानं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंबळ नदीमध्ये उडी घेऊन भाजप नेत्यानं आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मध्य प्रदेशातील मुरैना येथील भाजपचे ज्येष्ठ नेते नरेश गुप्ता यांचा अद्याप पत्ता लागला नाही. पोलिसांना घटनास्थळी फक्त त्यांची दुचाकी आढळली आहे. पोलिसांकडून सध्या नदीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिऴाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर सुसाईट नोट सापडली आहे. भाजपचे जेष्ठ नेते नरेश गुप्ता दीर्घ आजारानं त्रस्त होते. या आजाराला खूप कंटाळल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. नरेश गुप्ता यांना कर्करोगाचा त्रास सहन होत नसल्यानं त्यांनी स्वत: ला आणि आपल्या कुटुंबाला या समस्येपासून मुक्त करण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख या पत्रात केला आहे. हे वाचा- रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘या’ औषधाचं ट्रायल थांबवलं तणावात होते भाजपे ज्येष्ठ नेता नरेश गुप्ता कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार भाजप नेते नरेश गुप्ता बुधवारी दुपारी डॉक्टरला दाखवून परत आले. डॉक्टरांनी सांगितले की त्याचा आजार संपूर्ण शरीरात पसरला आहे. तेव्हापासून ते नैराश्येत होते. मध्यरात्री त्यांनी कुणाला काही न सांगता शांतपणे घर सोडले. ते स्कूटरने चंबळ नदीजवळ आले आणि त्यानंतर टोकाच पाऊल उचललं आहे. भाजपचे नेता कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. आपल्या आजार अखेरच्या टप्प्यात आहे हे समजल्यानंतर त्यांनी आयुष्य संपवलं आहे. हे वाचा- चीनसोबत सीमा संघर्षात भारताचे ‘या’ क्षेत्रात होऊ शकते मोठे नुकसान हे वाचा- चीनला धडा शिकवण्यासाठी भारताची तयारी, सीमारेषेवर हालचालींना वेग संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात