Home /News /national /

16 वर्षांच्या लेकराकडून घात, झोपलेल्या आई वडिलांवर कुऱ्हाडीनं वार; दोघांचा जागीच मृत्यू

16 वर्षांच्या लेकराकडून घात, झोपलेल्या आई वडिलांवर कुऱ्हाडीनं वार; दोघांचा जागीच मृत्यू

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका 16 वर्षीय मुलानं घरात झोपलेल्या आई वडिलांवर कुऱ्हाडीनं (Axe) हल्ला केला, ज्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

    राजस्थान, 17 डिसेंबर: राजस्थानमधील (Rajasthan) हनुमानगड जिल्ह्यातील नोहर पोलीस स्टेशन परिसरातून एक धक्कादायक (Shocking Incident) घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एका 16 वर्षीय मुलानं घरात झोपलेल्या आई वडिलांवर कुऱ्हाडीनं (Axe) हल्ला केला, ज्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या निर्दयी मुलाचं नाव किशोर असं आहे. आई वडिलांची हत्या करून किशोर येथेच थांबला नाही तर त्यानं त्यानंतर त्याच्या लहान भावावरही हल्ला केला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी झालेला किशोरचा लहान भाऊ रुग्णालयात जीवन-मरणाची झुंज देत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला नशा करण्याचं व्यसन आहे. जखमी भावाला फरफटत आणलं रस्त्यावर पोलिसांनी याघटनेबाबत सांगितलं की, आरोपी हा नोहर पोलीस स्टेशन हद्दीतील फेफाना गावचा रहिवासी असून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. घटनेनुसार, त्याचा 14 वर्षांचा लहान भाऊ अजय बुधवारी रात्री आई-वडील इंद्रादेवी आणि शीशपाल यांच्यासह घरात झोपला होता. आरोपीनं आधी आई-वडील आणि भावावर कुऱ्हाडीनं हल्ला केला, त्यानंतर आई वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ अजय हा गंभीर जखमी झाला. हेही वाचा- महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात Omicron चं थैमान, तासा-तासाला वाढताहेत रुग्ण   घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना आरोपी रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्याने अज्ञात आरोपीनं हल्ला केल्याचं सांगितलं. पोलिसांनी जखमी भावाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि नंतर पुन्हा आरोपीच्या घरी पोहोचले. अल्पवयीन मुलानं दिली गुन्ह्याची कबुली आरोपीच्या घरी आई-वडिलांचा मृतदेह पाहून पोलिसही अचंबित झाले. संशयावरून चौकशी केली असता अल्पवयीन मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तेथून मृतदेह उचलून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आरोपीचा लहान भावावर सध्या हरियाणातील सिरसा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हेही वाचा-  आनंदाची बातमी..! 'या' देशाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान प्राथमिक तपासाअंती अशी माहिती समोर आली की, आरोपीला व्यसन करण्याची सवय आहे. म्हणून काही दिवसांपूर्वी त्याला त्याच्या पालकांनी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं होतं तेथून तो परत आला. अशा स्थितीत पुन्हा तेथे पाठवले जाईल या भीतीनं त्याने आई-वडिलांवर हल्ला केला. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Rajasthan

    पुढील बातम्या