मराठी बातम्या /बातम्या /देश /

महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात Omicron चा कहर, तासा-तासाला रुग्णांचा आकडा वाढताच; देशभरात 97 रुग्ण

महाराष्ट्रानंतर 'या' राज्यात Omicron चा कहर, तासा-तासाला रुग्णांचा आकडा वाढताच; देशभरात 97 रुग्ण

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कोरोनाचा (Corona Virus) संसर्ग सातत्याने वाढत आहे. त्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 17 डिसेंबर: कोरोनाचा (Corona Virus) संसर्ग सातत्याने वाढत आहे. देशाची (National Capital, Delhi) राजधानी दिल्लीत कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे 10 नवीन रुग्ण आढळले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) 40 जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. यामध्ये 10 जणांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे आता देशभरात ओमायक्रॉनची लागण झालेले 97 रुग्ण समोर आले आहेत.

आता देशात Omicron व्हेरिएंटची 97 प्रकरणे समोर आली आहेत. तर दिल्लीत हा आकडा 20 वर पोहोचला आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे 85 नवीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये सुमारे 40 लोकांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ओमायक्रॉनची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. गुरुवारी सापडलेल्या बाधितांनी गेल्या चार महिन्यांचा विक्रम मोडला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत.

हेही वाचा- आनंदाची बातमी..! 'या' देशाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 20 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. त्यापैकी 10 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, सरकार प्रत्येक स्तरावर तयारी करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक कामावर सूक्ष्म पातळीवर लक्ष ठेवलं जात आहे. सरकार 64 हजारांहून अधिक ऑक्सिजन बेडची व्यवस्था करत आहे. 32 प्रकारच्या औषधांच्या बफर स्टॉकसाठी ऑर्डर देण्यात येत आहे.

महाराष्ट्र ओमायक्रॉनचा Hotspot

महाराष्ट्रात 32 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. महाराष्ट्र हे ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी Omicron चे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण

ओमायक्रॉन (Omicron variant) आता जगभरात हाहाकार माजवत आहे. त्याची भीषणता ब्रिटन (Britain) आणि अमेरिकेत (America) सर्वाधिक आहे. जिथे कोरोनाने ब्रिटनमधील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच वेळी, अमेरिकेत कोविडची प्रकरणे एका दिवसात दुप्पट झाली आहेत. ब्रिटनमध्ये गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) विक्रमी रुग्णांची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये गुरुवारी कोरोनाचे विक्रमी 88,376 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा- नवऱ्याचा हात बघताच भरमंडपात किंचाळली वधू, थेट लग्नालाच दिला नकार

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन वेगानं पसरत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्यानं सरकारची चिंता वाढली आहे. गेल्या 28 दिवसांत जे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते त्यातल्या 165 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सरकारनं दिली आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus