मराठी बातम्या /बातम्या /देश /

आनंदाची बातमी..! 'या' देशाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

आनंदाची बातमी..! 'या' देशाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

यासोबतच कोविड 19 महामारीच्या वेळी आणि वर्षानुवर्षे भारताकडून भूतानला करण्यात येत असलेल्या सहकार्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

यासोबतच कोविड 19 महामारीच्या वेळी आणि वर्षानुवर्षे भारताकडून भूतानला करण्यात येत असलेल्या सहकार्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

यासोबतच कोविड 19 महामारीच्या वेळी आणि वर्षानुवर्षे भारताकडून भूतानला करण्यात येत असलेल्या सहकार्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 17 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना भूतानने (Bhutan) सर्वोच्च नागरी (highest civilian award) पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर (Facebook account) ही माहिती दिली आहे. भूतानच्या या सर्वोच्च नागरी पुरस्काराचं नाव नागदेग पेल गी खोर्लो आहे. भूतानच्या राजानं पंतप्रधान मोदींसोबत विनाअट मैत्रीचा उल्लेख केला आहे. यासोबतच कोविड 19 महामारीच्या वेळी आणि वर्षानुवर्षे भारताकडून भूतानला करण्यात येत असलेल्या सहकार्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

फेसबुकवरील आपल्या अधिकृत पोस्टमध्ये, भूतानच्या पंतप्रधान कार्यालयानं भूतानच्या राजाच्या वतीनं म्हटलं आहे, भूतानच्या लोकांकडून अभिनंदन. तुम्हाला एक महान आणि आध्यात्मिक व्यक्ती म्हणून पाहिले. मी वैयक्तिकरित्या हा सन्मान साजरा करण्यास उत्सुक आहे. भूतानच्या बाजूने, मैत्री आणि सहकार्यासाठी पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे.

हेही वाचा-  नवऱ्याचा हात बघताच भरमंडपात किंचाळली वधू, थेट लग्नालाच दिला नकार

भूतानच्या राजानंही पंतप्रधान मोदींना देशभेटीचे निमंत्रण दिलं आहे. याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनेक देशांनी गौरव केला आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरात, मालदीव आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांना या पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.

2016 मध्ये सौदी अरेबियानं पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कार King Abdulaziz Sash Award ने सन्मान केला. त्याच वर्षी अफगाणिस्तानने Ghazi Amir Amanullah Khan यांना सर्वोच्च नागरी सन्मान देखील प्रदान केला.

फेब्रुवारी 2018 मध्ये पॅलेस्टाईननं पंतप्रधान मोदींना Grand Collar या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. त्याच वर्षी त्यांना दक्षिण कोरियाकडून Seoul Peace Prize पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पर्यावरण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी संयुक्त राष्ट्रानं पंतप्रधान मोदींना Champions of the Earth पुरस्कारानं सन्मानित केलं.

2019 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान Order of St. Andrew the Apostle यांनी सन्मानित केलं.

हेही वाचा- IND vs SA : टीम इंडियाला दिलासा, दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू घेणार माघार

2019 मध्येच, UAE ने देखील पंतप्रधानांना त्यांच्या सर्वोच्च सन्मान, Zayed Medal ने पुरस्कृत केले. त्याच वर्षी, मालदीवने आपला सर्वोच्च सन्मान, Rule of Izzudeen देखील बहाल केला.

First published:

Tags: Bhutan, PM narendra modi