मराठी बातम्या /बातम्या /देश /

72 लाखांची बेस प्राइज विक्री झाली 512 कोटींना! IPL खेळाडू नव्हे दर दारुच्या दुकानाचा लिलाव

72 लाखांची बेस प्राइज विक्री झाली 512 कोटींना! IPL खेळाडू नव्हे दर दारुच्या दुकानाचा लिलाव

राजस्थानात झालेला एक लिलाव आयपीएलच्या होणाऱ्या लिलावापेक्षाही अधिक चर्चेत आहे. कारण बेस प्राइजपेक्षा 708 पटींनी महाग दराला हा लिलाव झाला आहे

राजस्थानात झालेला एक लिलाव आयपीएलच्या होणाऱ्या लिलावापेक्षाही अधिक चर्चेत आहे. कारण बेस प्राइजपेक्षा 708 पटींनी महाग दराला हा लिलाव झाला आहे

राजस्थानात झालेला एक लिलाव आयपीएलच्या होणाऱ्या लिलावापेक्षाही अधिक चर्चेत आहे. कारण बेस प्राइजपेक्षा 708 पटींनी महाग दराला हा लिलाव झाला आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

हनुमानगड, 09 मार्च: महागड्या वस्तू, हिरे, जडजवहिरं, मौल्यवान दागिने, महान व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू, घरं यांचे लिलाव झाल्याचं आपल्याला माहित आहे. सगळ्यात ताजंच म्हणाल तर नुकताच इंडियन प्रीमिअर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील लिलाव झाला. पण हा लिलाव ऐकलात तर तो आयपीएलच्या लिलावालाही लाजवेल असा आहे. विशेष म्हणजे हा लिलाव मुंबई आणि दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलात नाही तर ऑनलाइन झाला आहे.

राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील नोहर या गावातील दारुच्या दुकानाच्या ठेक्यासाठी सरकारच्या वतीने ऑनलाईन लिलाव केला गेला. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी दारुच्या दुकानांचा लिलाव करायची पद्धत बंद करून लॉटरी पद्धतीने दुकानं दिले होते. गेल्यावर्षीपर्यंत ही पद्धत होती. मुख्यमंत्री गेहलोत यांनी लिलाव सुरू केला. नोहर गावातील दारुच्या दुकानाच्या ठेक्यासाठी झालेल्या लिलावात बेस प्राइज होती 72 लाख रुपये वर्षासाठी. सकाळी 11 वाजता ऑनलाइन सुरू झालेला हा लिलाव मध्यरात्री 2 वाजता संपला आणि हे दुकान शेवटी 512 कोटी रुपयांना विकलं गेलं. हाच ठेका गेल्यावर्षी 72 लाखांची बेस प्राइज असताना 65 लाख रुपयांना विकला गेला होता. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

(हे वाचा-300 किमी परीघातील शत्रूचा करेल खात्मा, सायलेंट किलर 'INS करंज'ची खास वैशिष्ट्ये)

एक्साईज अधिकारी अवाक

गेहलोत सरकारने हे दारु दुकान लिलावात विकल्यामुळे त्यातून मिळणाऱ्या किमतीच्या 2 टक्के रक्कम सरकारला कराच्या स्वरूपात मिळणार आहे. पण हा लिलाव प्रचंड चर्चेचा विषय ठरला जेव्हा ठेका विकल्याची किंमत एक्साइज अधिकाऱ्यांना कळाली तेव्हा त्यांचे डोळेच विस्फारले कारण एका खेड्यातल्या दुकानाला ही बोली मिळाली होती. एकाच कुटुंबातल्या दोन महिलांनी ही बोली लावून दुकान विकत घेतले.  त्यापैकी एकीचं नाव आहे किरण कंवर. बेस प्राइजच्या 708 पटींनी महाग किमतीला हे दुकान विकलं गेलं आहे.

(हे वाचा-खूशखबर! ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा; जाणून घ्या)

हे झालं एका दुकानाचं पण राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार राज्यातील 7000 दुकानांचे ठेके आता विकायचे आहेत. त्यामुळे आयपीएलमधील कुठला खेळाडू सर्वाधिक रुपयांना विकला गेला या कुतुहलासारखंच राजस्थानातील दारुच्या दुकानाचा ठेका किती रुपयांना विकला गेला अशीही उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली तर त्यात नवल राहणार नाही

First published:

Tags: Auction, Liquor stock, Rajasthan