क्षणार्धात 300 किमी परीघातील शत्रूचा करेल खात्मा, वाचा काय आहेत सायलेंट किलर 'INS करंज'ची खास वैशिष्ट्ये

क्षणार्धात 300 किमी परीघातील शत्रूचा करेल खात्मा, वाचा काय आहेत सायलेंट किलर 'INS करंज'ची खास वैशिष्ट्ये

समुद्रावर सत्ता गाजवायची असेल तर समुद्राच्या पाण्यावर आणि समुद्राच्या पोटातही युद्ध लढण्याचं सामर्थ्य हवं. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणबुडीचा ताफा पुर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्नं सध्या भारतीय नौदल करतंय.

  • Share this:

मुंबई, 09 मार्च: जगावर राज्य करायचं असेल तर समुद्रावर आपली सत्ता हवी..! असं भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाविक धोरण होतं. भारतीय नौदलही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि धोरण पुढे नेण्याचा प्रयत्नं करत आहे. कारण समुद्रावर सत्ता गाजवायची असेल तर समुद्राच्या पाण्यावर आणि समुद्राच्या पोटातही युद्ध लढण्याचं सामर्थ्य हवं. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाणबुडीचा ताफा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्नं सध्या भारतीय नौदल करत आहे.

प्रकल्प 75 अंतर्गत भारतीय नौदल फ्रान्सच्या तंत्रज्ञांनी विकसीत केलेल्या स्कॉर्पियन पाणबुडींचं संपूर्णपणे भारतीयकरण करून स्वबळावर 6 पाणबुडी बांधत आहे. त्यापैकी INS कलवरी आणि INS खांदेरी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यात. आता याच वर्गातील तिसरी पाणबुडी 'INS करंज' भारतीय नौदलात कर्तव्य बजावण्यास सज्ज झाली आहे. INS करंज पाणबुडीचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे समुद्राच्या पोटात असताना कोणताही आवाज न करता, क्षत्रू देशांच्या युद्धनौका आणि पाणबुडींच्या रडार यंत्रणांना चकवा देऊन मोहीम फत्ते करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.

(हे वाचा-महिला दिनी काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद विधानसभेत आल्या घोड्यावर; पाहा PHOTOS)

युद्धजन्य काळात क्षत्रू देशांच्या नाविक तळांवरील सुक्ष्म हालचालींची माहिती अचूकपणे टिपण्यास INS करंज महत्वाची भूमिका निभावणार आहे. समुद्राच्या पाण्याखाली सलग 45 दिवस रहाण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. त्यामुळे INS करंज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यामुळे पाकिस्तान आणि चीनला धडकी भरली असणार हे नक्की.

काय आहेत INS करंज पाणबुडीची खास वैशिष्ट्ये?

-ही पाणबुडी समुद्रातील 300 किलोमीटर परीघातील युद्धनौका नष्ट करु शकते

-स्कॉर्पियन वर्गातील तिसरी सायलेंट किलर पाणबुडी

-सलग 45 दिवस सुमद्राच्या पाण्याखाली राहण्याची क्षमता

-शत्रू देशांच्या नौदल हालचालींवर अगदी जवळ जाऊन नजर ठेवणं शक्य होणार आहे.

-INS पाणबुडी समद्रात कोणताही आवाज न करता आपलं कर्तव्य बजावू शकते. त्यामुळे क्षत्रू देशांच्या रडार यंत्रणांना चकवा देण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.

INS करंज एका तासात 35 नाँटीकल मैल वेगाने प्रवास करू शकते.

INS करंज पाणबुडी 67 मीटर लांब, 6.2 मीटर रुंद, आणि 12.3 मीटर उंच आहे. तर वजन 1550 टन आहे. आणि खोल समुद्रात 350 मीटर खोली पर्यंत जाऊ शकते.

(हे वाचा-Opinion Poll: बंगालमध्ये पुन्हा ममता सरकार, वाचा 5 राज्यात कोणाला मिळणार सत्ता)

-INS करंज पाणबुडीत एकावेळी 40  जवान कर्तव्य बजावू शकतील

-जास्त काळ पाण्यात रहाण्यासाठी INS करंज पानबुडीत 750 किलो वजनाच्या 360 बॅटरी बसवण्यात आल्यात. बॅटरीला चार्ज करण्यासाठी 1250  वॅटचे 2 डिझेल जनरेटर देखील आहेत.

-INS करंज पानबुडी समुद्रात एकदा उतरल्या नंतर सलग 12 हजार किलोमीटरचा प्रवास करू शकते

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 9, 2021, 8:29 AM IST

ताज्या बातम्या