Home /News /national /

राज ठाकरेंना पुन्हा कोरोना, गायकाचं कॉन्सर्टमध्ये निधन, समलैंगिक जोडप्याला परवानगी TOP बातम्या

राज ठाकरेंना पुन्हा कोरोना, गायकाचं कॉन्सर्टमध्ये निधन, समलैंगिक जोडप्याला परवानगी TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 01 जून : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध गायक  कृष्णकुमार कुन्नथ (Singer Krishnakumar Kunnath) याच लाईव्ह कार्यक्रमात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी सारखं काही नाही, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण. CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले असल्याची शिक्षणमंत्र्यांची माहिती. राज ठाकरे यांना कोरोना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital mumbai) राज ठाकरे यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray corona test positive) यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. गायक केकेचं लाईव्ह कॉन्सर्टमध्ये निधन प्रसिद्ध गायक  कृष्णकुमार कुन्नथ (Singer Krishnakumar Kunnath) याच लाईव्ह कार्यक्रमात निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना केके याचा ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुणे पालिकेची आरक्षण सोडत जाहीर पुणे महापालिका निवडणूक 2022 साठीची ( Pune Municipal Corporation reservation ) आरक्षण सोडत आज काढण्यात आली आहेत. गेल्या वेळी 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यावेळी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत आहे. त्यामुळे विद्यमान 29 नगरसेवकांना उमेदवारीसाठी पक्षांतर्गंत सहकाऱ्यांशी संघर्ष करावा लागणार आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महाविकास आघाडी सरकामध्ये काँग्रेस नाराज? राज्यसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजी सारखं काही नाही. इम्रान प्रतापगढी महत्वाचा युवक कार्यकर्ता असून त्याने पक्षा करता खूप काम केलंय. मुकुल वासनिक यांना राजस्थान मधून प्रतिनिधीत्व मिळालंय. आपण उत्तर प्रदेशला आणि राजस्थान आपल्याला मत देणार असल्याची स्पष्टोक्ती महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) आहे ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र  CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. समलैंगिक महिला जोडप्याला एकत्र राहण्याची कोर्टाकडून परवानगी केरळ हाय कोर्टाने (Keral High Court) मंगळवारी समलैंगिक नात्याबाबत मोठा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने आदिलाद्वारा दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पस याचिकावर निर्णय सुनावला. कोर्टाने समलैंगिक प्रेमी जोडपं आदिला नसरीन (22 वर्षे) आणि फातिमा नूरा (23 वर्षे) यांना एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. देशात यंदा 100 टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस मान्सूनचे आगमन (MONSOON UPDATE) होणार असल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान यंदा देशात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Lesbian girls, Raj Thackeray

    पुढील बातम्या