मुंबई, 31 मे : : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital mumbai) राज ठाकरे यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray corona test positive) यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून पायाच्या व्याधीने त्रस्त आहेत. त्यांच्या पायावर बुधवारी शस्त्रक्रिया पार पडणार होती. त्यामुळे त्यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर वेगवेगळ्या चाचण्या पार पडल्या. दरम्यान, राज ठाकरे यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. आज संध्याकाळी राज ठाकरे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना उपचार करून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया पार पडणार होती. ती शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ( पावसाळ्यात फिरण्यासाठी बेजट कमी आहे? फक्त 3 हजारात या हिल स्टेशनचा आनंद घ्या ) राज ठाकरे यांना घरीच होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी राज ठाकरे यांना ऑक्टोबर 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार होती. पण कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. दरम्यान, कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मारुती मोरे यांनी दिली. ( विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा ) ऑक्टोबर 2021 मध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी कोरोनाने शिरकाव केला होता. राज ठाकरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली होती. सर्वांवर लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात आले होते. उपचाराअंती सर्वांनी कोरोनावर मात केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.