• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • रेल्वे प्रवासात रात्री मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही! जाणून घ्या नेमकं कारण

रेल्वे प्रवासात रात्री मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही! जाणून घ्या नेमकं कारण

Indian Railway: लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज आहे की नाही याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण भारतीय रेल्वे (Indian Railway) लवकरच चार्जिंगबाबत मोठा निर्णय घेणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 मार्च: लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज आहे की नाही याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण भारतीय रेल्वे (Indian Railway) लवकरच चार्जिंगबाबत मोठा निर्णय घेणार आहे. रात्रीच्या प्रवासात आता प्रवाशांना मोबाईल लॅपटॉप चार्ज (Mobile Laptop Charging) करता येणार नाही. ट्रेनमध्ये आगीच्या (Train Fire Incident) घटना घडल्यानंतर रेल्वे हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. रेल्वे प्रवासावेळी रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेदरम्यान चार्जिंग करणारे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट बंद ठेवणार आहे अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. या निर्णयाचा लाखो प्रवाशांना फटका बसणार आहे. जर बॅटरी डाऊन झाली तर थेट सकाळी 5 वाजता चार्ज करावी लागणार आहे. चार्जिंग सॉकेटमुळे देहरादूनला जाण्याऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका कोचला 13 मार्चला आग लागली होती. बघता बघता या आगीनं सात कोच आपल्या कवेत घेतले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर काही दिवसांनी रांची स्टेशनवर उभ्या असलेल्या एका मालगाडी इंजिनला आग लागली होती. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झालं आहे.

  (वाचा - कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी;1 एप्रिलपासून कामाची वेळ बदलणार,काय आहे सरकारचा प्लॅन)

  निष्काळजीपणाचा फटका नेहमीच सहप्रवाशांना बसत असल्याचा अनेक घटना आहेत. अनेक जण तर रात्रभर मोबाईल आणि लॅपटॉप चार्जिंगला लावून झोपून जातात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली, तर रात्रीच्या झोपेत काही कळत नाही. त्यामुळे होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी रेल्वे हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

  (वाचा - Gold Price Today: सोन्याचा दर आणखी घसरला, चांदीही स्वस्त; पाहा आजचा लेटेस्ट रेट)

  रेल्वे प्रशासन रेल्वेत ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणं आणि धूम्रपान संबंधित नियमावलीही अधिक कठोर करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे अधिनियम कलम 164 अंतर्गत रेल्वेतून ज्वलनशील पदार्थ नेण्यावर तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा 1000 रुपये किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तर कलम 165 अंतर्गत 500 रुपयांचा दंडाची तरतूद आहे.
  Published by:News18 Digital
  First published: