Gold Price Today: सोन्याचा दर आणखी घसरला, चांदीही स्वस्त; जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोन्याचा दर आणखी घसरला, चांदीही स्वस्त; जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

दिल्ली सराफा बाजारात 30 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) 138 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे. सोन्याचे दर अद्यापही 44000 रुपयांच्या जवळपास आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मार्च : भारतीय बाजारात आज मंगळवारी सोने दरात घसरणीची नोंद झाली. दिल्ली सराफा बाजारात 30 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) 138 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे. सोन्याचे दर अद्यापही 44000 रुपयांच्या जवळपास आहेत. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही (Silver Price Today) घसरण झाली आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर 44,251 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 63,532 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाली, तर चांदीचा भाव जैसे थे राहिला.

सोन्याचा आजचा दर (Gold Price, 30 March 2021) -

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा दर 138 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या अर्थात 24 कॅरेट सोन्याचा दर 44,113 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. याआधीच्या सत्रात 10 ग्रॅम साठीचा दर 44,251 रुपये इतका होता.

चांदीचा आजचा भाव (Silver Price, 30 March 2021) -

चांदीच्या किंमतीत आज 320 रुपये प्रति किलोग्रॅमची घसरण झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 63,212 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

(वाचा - Gold Price: आतापर्यंत 12,927 रुपयांची घसरण; सोन्यात गुंतवणूक करावी का, पाहा काय आहे जाणकारांचं म्हणणं)

सोने दरात घसरण का?

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयात कमी आल्याने भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. तसंच जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान वेगात सुरू असून गुंतवणुकदार गुंतवणुकीसाठी इतर पर्यायांकडे वळले आहेत. त्यामुळेच सोन्याचे दर घसरले आहेत. परंतु ही स्थिती अधिक काळ राहणार नसून 2021 मध्ये सोन्याच्या किंमती 63 हजारांपर्यंत पोहचू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.

Published by: Karishma Bhurke
First published: March 30, 2021, 8:21 PM IST

ताज्या बातम्या