मंदसौर, 16 फेब्रुवारी : राजकीय वर्तुळात नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विवादास्पद वक्तव्यांची कायम चर्चा असते. भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी शनिवारी कॉग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत अत्यंत विवादास्पद वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यांवर अद्याप कॉंग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भाजप खासदार म्हणाले की, परदेशी कन्येपासून जन्मलेले राहुल गांधी यांचा जन्म देशासाठी मोठी चूक आहे. परदेशातील कन्येपासून जन्मलेल्या मुलाने भारताच्या राजकारणात हस्तक्षेप करावा, हे नीतीलादेखील मान्य नाही. खासदारांनी ही टिप्पणी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवर पलटवार आहे. कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे, की हल्ल्यामुळे सर्वाधिक कोणाला फायदा झाला? हल्ल्यामागील तपासाचा अहवाल काय होता? हल्ल्याची परवानगी देणाऱ्या सुरक्षेतील चुकीसाठी सरकारने कोणाला जबाबदार ठरविले. भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांनी प्रश्न उपस्थित केला की एका इटालियन महिलेसोबत एका भारतीय व्यक्तीचा विवाह केल्यामुळे कोणाला फायदा झाला. विवाहाचा निष्कर्ष राहूल आहेत. या विवाहाच्या चुकीसाठी कोण जबाबदार आहेत? कॉंग्रेस या चुकीची जबाबदारी स्वत:वर घेणार का? यानंतर खासदाराने एनआरसीच्या विरोध हा ठरवून केल्याचे सांगितले. यानंतर दिल्लीतील विधानसभा निवडणुकींविषयीदेखील ते बोलले. ते म्हणाले निवडणुकीत यश-अपयश येत असतं. अन्य बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







