अहमदाबाद, 16 फेब्रुवारी : मतभेद किंवा असहमतील दडपणे आणि जनतेच्या मनात भीती निर्माण करण्याची कृती नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालते. आणि घटनात्मक मूल्यांसोबत असलेली बांधिलकी ओलांडते. असहमती असू शकते व आपली मतभिन्नता व्यक्त करणे आणि मांडण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. अशा प्रकारच्या मतभेदाला देशविरोधी किंवा लोकशाहीविरोधी म्हणणे हा लोकशाहीसोबत केलेला विश्वासघात आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आपले मत व्यक्त केले. अशा प्रकारच्या असहमतीला न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ‘सेल्फी वॉल्व’ असल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शांतिपूर्ण सुरू असलेल्या आंदोलनाचे समर्थन करताना ते म्हणाले, असहमतीचे संरक्षण करणे हे लोकाशाहीने निवडलेले सरकार आम्हाला विकास आणि सामाजिक समन्वयासाठी योग्य न्याय देत आहे, या गोष्टीची आठवण करु देतं. यासह ते म्हणाले की, आपल्या समाजाला परिभाषित करणारी मूल्ये आणि ओळखींवर सरकार कधीही मक्तेदारीचा दावा करू शकत नाही.
Justice DY Chandrachud warns against "blanket labeling of dissent as anti-national"
— ANI Digital (@ani_digital) February 15, 2020
Read @ANI Story | https://t.co/KMVuLmWDfu pic.twitter.com/ey71LIpM9k
सध्या देशभरात CAA आणि NRC संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यांनी नागरिकांच्या असहमतीला देशविरोधी म्हणणे चुकीचे असल्याचे म्हटले असून ही कृती लोकशाहीविरोधी असल्याचेही म्हटले आहे.

)







