पप्पा तुम्ही दारू का पिता? असं विचारल्यामुळे बापानेच लेकीला जिवंत जाळलं

पप्पा तुम्ही दारू का पिता? असं विचारल्यामुळे बापानेच लेकीला जिवंत जाळलं

वडिलांना वाचविण्यासाठी मुलीने गेल्या आठवड्यात पोलिसांना चुकीची माहिती दिली होती

  • Share this:

लातूर, 16 फेब्रुवारी : गेल्या आठवड्यात लातूरमधील एमआयडीसी रुग्णालयात मुलगी पेटल्याची घटना नोंदविण्यात आली होती. त्यावेळी दूध तापविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने विद्यार्थिनीचा चेहरा भाजल्य़ाचे सांगितले होते. याबाबत पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली होती. त्यामुळे या मुलीचा चेहरा नक्की कशामुळे भाजला, याबाबत लावण्यात येणाऱ्या तर्क वितर्कांना अखेर पूर्णविराम लागला असं वाटलं होतं. दीपज्योती नगरमधील दहावीत शिकणारी मुलगी घरात दूध तापविताना अचानक स्टोव्हचा भडका होऊन तिचा चेहरा भाजला. घटना घडली तेव्हा घरी कोणीही नव्हते. पहिल्यांदा लहान भावाने बहीण भाजल्याचे बघितल्यानंतर आरडाओराडा करुन शेजाऱ्यांना बोलवले. त्यांनी मुलीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. मात्र या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. दरम्यान शनिवारी पीडित मुलीने आपला जबाब पुन्हा दिला. त्या तिने म्हटले आहे की, 6 फेब्रुवारी रोजी घरात मी एकटी होते. त्यावेळी वडील दारू पिऊन घरी आले. मी त्यांना तुम्ही रोज का दारू पिता असं विचारला असता ते रागावले व त्यांनी मुलीला मारहाण केली. वडिलांनी बेल्ट काढून तिला मारले. मुलीनी आईला सांगते असं म्हटल्यावर तुला आणि तुझ्या आईला जाळतो असं म्हणत घरातील रॉकेलची बाटली घेऊन मुलीच्या डोक्यावर टाकली आणि केस पेटविले. आरडाओरडा केल्यानंतर वडील तेथून पळाल्याचे पीडित मुलीने सांगितले. वडिलांनी याबाबत धमकी दिल्याने मी तक्रार दाखल केली नसल्याचे पीडितेने सांगितले. तिच्या या जबाबानुसार पोलिसांनी पीडितेच्या वडिलांविरोधात कलम 307 नुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

अन्य बातम्या

‘जय श्रीराम’चा नारा देताच अखिलेश यादव भडकले, काय झालं भर सभेत पाहा VIDEO

पेट्रोलमुळे महिला 67 टक्के भाजली, जबाब देताना पीडितेची धक्कादायक माहिती

First published: February 16, 2020, 10:00 AM IST
Tags: firelatur

ताज्या बातम्या