कन्नोज, 16 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशातील कन्नोज स्थित समाजवादी पार्टीच्या कार्यालयात महिला संमेलनादरम्यान एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. सपाचे अखिलेश यादव व्यासपीठावर भाषण देत असताना एका तरुणाने रोजगारसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. अखिलेश यांनी त्यांना पुढे येण्यास सांगितले. तरुण जसा व्यासपीठाजवळ आला त्याने मोठ्याने ‘जय श्रीराम’चा नारा दिला. यावर अखिलेश यादव म्हणाले की, मी विष्णू भगवानला मानतो…कृष्ण भगवानलाही मानतो…याचा अर्थ मी कायम हेच बोलत नाही. यानंतर उपस्थित सपा नेत्यांनी त्या तरुणाला भाजप कार्यकर्ता म्हणत मारहाण केली. यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला गर्दीतून बाहेर काढले. या तरुणाच्या वक्तव्यावर अखिलेश यादव खूप नाराज झाले. आणि त्यांनी व्यासपीठाच्या सुरक्षिततेवरुन तैनात असलेल्या तालग्रामचे इन्स्पेक्टर राजा दिशेन सिंह यांना फटकारले. पोलीस तैनात असताना भाजपाचा माणूस येथे कसा आला. ते म्हणाले, तरुणाकडे बॅग होती. त्यात काय होतं कुणाला माहिती? त्याची बॅग तपासायला हवी होती. अखिलेश इतकं म्हणून थांबले नाही तर त्यांनी जोपर्यंत पोलीस त्या तरुणाचं नाव आणि पत्ता देत नाहीत तोपर्य़ंत ते कुठेही जाणार नसल्याची चेतावणी दिली. भाषण संपल्यानंतर अखिलेश यांनी पुन्हा तरुणाचे नाव आणि पत्ता विचारला.
#WATCH Uttar Pradesh: Samajwadi Party President Akhilesh Yadav scolds a police officer after a man went near the dais and chanted 'Jai Shri Ram' while he was addressing a gathering in Kannauj district today. pic.twitter.com/2XGk9kQHhh
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 15, 2020
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अखिलेश म्हणाले, की आमच्या सभांमध्ये भाजप कार्यकर्त्यांना पाठवून आमचा कार्यक्रम उधळविण्याचा प्रयत्न करू शकत नाही. अखिलेश म्हणाले, मी त्या मुलाला तुरूंगात टाकू नका, असे प्रशासनाला सांगेन. पण त्या मुलाची आणि त्याचा वडिलांशी आमची भेट घडवून आणा. कारण सभा रोखण्यामागचं कारण तरी लक्षात येईल. शांततेचा भंग केल्याबद्दल तरुणांवर कारवाई केली जात असल्याचे सदर कोतवाल विनोद मिश्रा यांनी सांगितले. हा युवक गुगरापूरचा राहणारा असून अशोक कुमार शुक्ला असे या त्याचे नाव आहे. जो बी.ए. केल्यानंतर एलएलबी करत आहे.

)







