Home /News /national /

संसदेचं अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात; सरकारला घेरण्याची संधी पुन्हा गमावल्याने काँग्रेस नेते नाराज

संसदेचं अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात; सरकारला घेरण्याची संधी पुन्हा गमावल्याने काँग्रेस नेते नाराज

Rahul gandhi misses parliament Monsoon session - राहुल गांधी यांच्यावर नेहमी आरोप केला जातो की, ऐन गरजेच्या वेळी ते गायब होतात. आताही त्यांच्या 'मुहूर्ता'वरच्या परदेश दौऱ्यामुळे काही नेते नाखूश आहेत.

    पल्लवी घोष नवी दिल्ली 14 सप्टेंबर : संसदेचं पावसाळी अधिवेशन Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे बरंच लांबलं. आता सोमवारपासून संसदेचं मान्सून सत्र (parliament monsoon session) सुरू झालं आहे. नेमक्या त्याच मुहूर्तावर राहुल गांधी (Rahul gandhi) परदेशात गेले आहेत. कोरोनाची साथ त्यात बिहार निवडणुकांचे (Bihar elections) पडघम वाजत असताना केंद्र सरकारला (Modi government) घेरण्याची नामी संधी वाया घालवल्याने काँग्रेसचे (Congress) काही नेते राहुल गांधी यांच्यावर नाराज झाले आहेत. राहुल गांधी यांच्यावर नेहमी आरोप केला जातो की, ऐन गरजेच्या वेळी ते गायब होतात. ज्या वेळी सरकारविरोधात भूमिका घेऊन नेतृत्व करण्याची संधी असले त्या वेळी नेमके राहुल गांधी कुठेच दिसत नाहीत. CAA च्या विरोधातल्या आंदोलनावेळी किंवा दिल्लीत दंगली झाल्या त्या वेळीही हेच दिसलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने अगदीच गुळमुळीत भूमिका घेतली. त्यांचं नेतृत्व सरकारला घेरण्यात कमी पडलं, असं नेहमी म्हटलं जातं. आता एवढ्या दिवसांनंतर होणाऱ्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनातही राहुल गांधी अनुसपस्थित आहेत. बिहार निवडणुका तोंडावर आल्या आहेत. Coronavirus च्या साथीने देशात कहर केला आहे. पण सरकारला समोरासमोर प्रश्न विचारायची, सरकारवर संसदेच्या माध्यमातून अंकुश ठेवण्याचा विरोधी पक्षनेत्याची भूमिका मात्र राहुल गांधी करणार नाहीत. ते देशाबाहेर असले, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक विरोध करताना दिसत आहेत. सोमवारी सकाळीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या Viral झालेल्या मोराच्या VIDEO वरून पंतप्रधानांना लक्ष्य केलं. जळजळीत प्रतिक्रिया देताना राहुल यांनी लिहिलं आहे की, Covid साथीचा कळस गाठलेला असताना पंतप्रधान मोरांबरोबर व्यग्र आहेत. एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशात अनियोजित लॉकडाऊन झाला आणि आता कोरोना देशभर पसरला आहे. पण Twitter वरून असा हल्ला करणारे राहुल गांधी प्रत्यक्ष समोरा समोर पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याच्या वेळी मात्र गायब आहेत. नेमक्या याच वेळी परदेश दौऱ्यावर जाऊन त्यांनी ही संधी गमावल्याचं काही काँग्रेस नेत्यांना वाटतं. काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांच्या लेटर बाँबने पक्ष कार्यपद्धतीला सुरुंग लावल्याची घटना अजून ताजी आहे. त्यातच आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राहुल यांची अनुपस्थिती आणखी उठून दिसणारी आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू, खासदारांसाठी असेल प्लास्टिक शीटची 'भिंत' राहुल गांधी यांनी लोकसभेच्या सभापतींना पत्र लिहून आपण या सत्राला उपस्थित राहू शकणार नसल्याचं कळवलं आहे आपली आणि आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना घेऊन नियमित हेल्थ चेकअपसाठी देशाबाहेर जावं लागणार असल्याचंं त्यांनी कळवलं आहे. राहुल गांधी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून, चीन सीमेच्या मुद्द्यावरून सरकारला वेळोवेळी खरमरीत सवाल केले आहेत. केंद्र सरकारला आक्रमक शब्दांत जाब विचारला आहे. पण नेमक्या अधिवेशनाच्या वेळी ते अनुपस्थित राहणार असल्यामुळे काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू आहे. राहुल गांधी यांच्या पक्षातल्या समर्थकांचं म्हणणं आहे की, राहुल प्रत्यक्ष उपस्थित नसले, तरी त्यांचं घडामोडींवर लक्ष आहे. सरकारला घेरण्याची संधी ते सोडणार नाही. त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नाही आणि त्यांचा परदेश दौरा वैयक्तिक आणि आरोग्याच्या कारणासाठी आहे. त्यावरून राजकारण करण्यात अर्थ नाही. वाचा सविस्तर - लेटर बॉम्बनंतर बदललं काँग्रेसचं अंतर्गत राजकारण पण बिहार निवडणुका तोंडावर आल्या असताना भाजपला घेरण्याच्या आणि एकटं पाडण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांची मोट बांधण्याची संधी अधिवेशनाच्या माध्यमातून मिळू शकते आणि ऐन मोक्याच्या क्षणी माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची अनुपस्थिती काँग्रेसला नक्कीच बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते, असं काही नेत्यांचं मत आहे. काही ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रावरून पक्षांतर्गत गदारोळ उठल्यानंतर आता कुणी उघडपणे राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याबद्दल बोलत नाही. पण काही नेते नाखूश असल्याची चर्चा खासगीत सुरू असते.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Congress, Rahul gandhi

    पुढील बातम्या