Home /News /national /

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू, खासदारांसाठी असेल प्लास्टिक शीटची 'भिंत'

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू, खासदारांसाठी असेल प्लास्टिक शीटची 'भिंत'

पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र घेण्यात आलं आहे. तर सामाजिक अंतर ठेवतच संसदेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : संपूर्ण देशात सध्या कोरोनाचं संकट आहे. रोजच्या वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे चिंतेचं वातावरण असताना यात आता संसदेचं पावसाळी अधिवेशन (monsoon session of parliament 2020) सुरू होणार आहे. आजपासूनच (सोमवार, 14 सप्टेंबर) अधिवेशनाला सुरुवात होणार असून 1 ऑक्टोबरपर्यंत याचं कामकाज चालू असणार आहे. पण कोरोनाच्या धोक्यामुळे पहिल्यांदाच अधिवनेशनात मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र घेण्यात आलं आहे. तर सामाजिक अंतर ठेवतच संसदेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाच्या राजकीय पक्षांना मेन चेंबर आणि विजिटर्स गॅलरीमध्ये जागा नियुक्त करण्यात आल्या आहेत. आता यातल कोणती जागा कोणत्या खासदारासाठी घ्यायची याचा निर्णय त्या-त्या राजकीय पक्षांवर आहे. अधिवेशनाच्या कार्यकाळात कोणतेही खासदार एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्लास्टिकच्या शीटचाही वापर केला असल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर खासदारांना 'अटेंडन्स रजिस्टर' अ‍ॅपद्वारे हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली हिंसा: UAPA मध्ये उमर खालिदला अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई कोरोनाच्या धोक्यामुळे अधिवेशनात अनेक बदल 14 सप्टेंबरपासून सुरू होणारं संसदेचं पावसाळी अधिवेशन हे 1 ऑक्टोबरपर्यंत चालेल. या काळात, सलग 18 बैठका पार पडती, ज्यामध्ये 45 विधेयक आणि 11 अध्यादेश आणले जातील. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यानंतर संसदेचं कामकाज सुरू करण्यात येईल अशी शक्यता आहे. तर यासगळ्यात अधिवेशनाचं कामकाज तहकूब करण्यासाठी विरोधकही तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील तज्ज्ञाने सांगितली कोरोना लशीची खरी परिस्थिती; किमान एक वर्ष तरी... दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आठवड्याच्या 7 ही दिवशी होईल. यावेळी आठवड्याची सुट्टी मिळणार नाही. दररोज 4 तास दोन्ही सत्रांचं कामकाज सुरू असेल. तर अधिवेशनाता पहिला दिवस वगळता उर्वरित राज्यसभा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत पार पडणार, तर लोकसभा संध्याकाळी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत असेल अशी माहिती देण्यात आली आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Parliament session

    पुढील बातम्या