Home /News /national /

लेटर बॉम्बनंतर बदललं काँग्रेसचं अंतर्गत राजकारण, वाचा सविस्तर

लेटर बॉम्बनंतर बदललं काँग्रेसचं अंतर्गत राजकारण, वाचा सविस्तर

राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद

राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद

काँग्रेसच्या 23 असंतुष्टांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारणारा लेटर बॉम्ब टाकल्याने याची सर्वत्र चर्चा झाली होती व काँग्रेसमधील अंतर्गगत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले होते़.

    मुंबई, 14 सप्टेंबर : गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल पराभूत होत असताना शशी थरूर, मनीष तिवारी, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि विवेक तन्खा यांना अनिश्चित भविष्यास सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीतून त्यांची हकालपट्टी केली. काँग्रेसच्या 23 असंतुष्टांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारणारा लेटर बॉम्ब टाकल्याने याची सर्वत्र चर्चा झाली होती व काँग्रेसमधील अंतर्गगत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले होते़. त्यांच्या गटबद्धतेने आता एक अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे़. पक्षात नाराज असलेल्या मुकुल वासनीक, आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, आणि जतीन प्रसाद यांनी नवीन जबाबदाऱ्या फेटाळल्या तरच त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीत निवडणुकांचा जो संकल्प मांडला आहे, तो योग्य वाटेल अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर सचिन पायलट व शशि थरूर या दोन मोठ्या नेत्यांच्या बाबतीत सोनिया यांची भूमिका नेमकी काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़. दरम्यान, ज्यांनी कार्यकारिणीच्या निवडणुकांच्या मागणी केली होती, अशा 23 सदस्यांमध्ये जरी सचिन पायलट यांचा समावेश नसला तरी त्यांनी राजस्थानमध्ये गेहलोत सरकाविरोधात पुकारलेले बंड देशात गाजले़. अंतर्गत सूत्रांनुसार पायलट एआयसीसीच्या भूमिकेत असतील. आता ही एआयसीसी माध्यमांसाठी असेल का यावर चर्चा सुरू आहे. मुंबई सोडताच कंगनाचं ट्वीट, 'यावेळी वाचले नाहीतर सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित दुसरीकडे काँग्रेसचे लोकसभेतील एक महत्त्वाचे नेतेपद रिक्त आहे. अधिर राजन चौधरी यांना बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतर चौधरींनी मात्र दोन्ही पदे कायम ठेवली आहे. त्यामुळे एक नेता एक पद यानुसार चौधरी संसदेतील हे पद पक्षासाठी सोडतील असाही एक कयास आहे. अशा परिस्थितीत थरूर आणि मनीष तिवारी दोघेही दावेदार असू शकतात. तथापि, त्यांचा हा विरोध कायम राहिल्यास लोकसभेत पक्षाचे मुख्य व्हीप असलेल्या के. सुरेश यांना याचा फायदा होईल. मुकुल वासनिक यांना सोनिया गांधींना मदत करण्यासाठी नेमलेल्या विशेष समितीत समाविष्ट केल्याने मोठा स्फोट झाला आहे. ए के अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल आणि रणदीपसिंग सुरजेवाला यांचा समावेश असलेल्या पॅनेलची सर्वाधिक मागणी होती. हे पॅनेल कॉंग्रेस पार्लमेंटरी बोर्ड किंवा सामूहिक नेतृत्वाच्या गटासारखे आहे. जे मतभेद करणाऱ्यांना हवे होते. नजीकच्या काळात सोनिया गांधी देशाबाहेर गेल्यास त्यांच्या अनुपस्थितीत हे पॅनेल त्यांच्यासाठी काम करेल. वासनिक हे एक संघटनात्मक माणूस राहिलेले आहेत. जे राजीव गांधी ते पीव्ही नारसिंहा राव, सीताराम केसरी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पक्षाचे सलग अध्यक्ष होते. म्हणूनच, जी -23 मध्ये त्यांची उपस्थिती नेहमी थोडी विचित्र होती. कोरोनाचा विस्फोट होताना पुणेकरांची एक चूक नडणार, धोका वाढला तरी मास्क हनुवटीवरच नुकत्याच झालेल्या कॉंग्रेसच्या घडामोडींवरून असे दिसून येते की सोनिया या सर्व विरोधकांपेक्षा एक पाऊल पुढे होत्या. नवीन नेमणुकांकडे बघितले असता एआयसीसीत पुन्हा प्रवेश् करणे आझाद, सिब्बल यांचा मोठा पराभव आहे तर अन्वर वासनिक, शर्मा व प्रसाद तसेच सिंग यांनी चर्चेतुन वाटाघाटी केल्याने ते पात्र ठरतील. त्यात शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, विवेक तन्खा यांच्याबाबत विचार केला असता त्यांनी माघार घेतल्यास अन्य पर्याय शोधण्याचा पर्याय असू शकतो़.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Congress

    पुढील बातम्या