खरगोन (मध्यप्रदेश), 25 नोव्हेंबर : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये गेली आहे. मध्य प्रदेशमध्येही या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील खरगोनमध्ये गेलेल्या राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान मोठा वाद समोर आला आहे. यात्रेदरम्यान वादग्रस्त घोषणा दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. असा आरोप मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी एक व्हिडिओ ट्विट करत केला आहे. यावर काँग्रेसनेही त्यावर पलटवार केला आहे. भाजपने केलेल्या आरोपांचे काँग्रेसकडून खंडण करण्यात आले आहे.
खरगोनला पोहोचलेल्या राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ दरम्यान वादग्रस्त घोषणांमुळे देश तोडण्याची काँग्रेसची मानसिकता उघड होत आहे, यामुळे राहुल गांधींनी देशाची माफी मागावी,’ असे आशयाचे ट्वीट करत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. मध्य प्रदेश भाजपचे मीडिया प्रभारी लोकेंद्र पराशर यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
After Richa Chaddha’s public application to join Rahul Gandhi’s Bharat “Jodo” Yatra, “Pakistan Zindabad” (listen towards the end of the video) slogans raised in Khargon.
— Amit Malviya (@amitmalviya) November 25, 2022
INC MP posted the video and then deleted it after the faux pas came to light.
This is Congress’s truth… pic.twitter.com/ZkVEkd4pCf
हे ही वाचा : ‘महिलांनी कपडे घातले नाहीत तरी…’, अमृता फडणवीसांसमोरच रामदेवबाबांची जीभ घसरली
ते म्हणाले की, खरगोनमधील भारत जोडो यात्रेदरम्यान वादग्रस्त घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून हे ट्विट करण्यात आले आणि नंतर ते काढून टाकण्यात आले, यामुळे काँग्रेसच्या मनात काय आहे हे सत्य समोर आले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश ट्वीटद्वारे म्हणाले की, भाजपच्या डर्टी ट्रिक्सने शेअर केलेला व्हिडिओ #Bharat Jodo Yatra ला बदनाम करण्यासाठी शेअर केला जात आहे. यावर आम्ही तातडीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या आरोपांचे खंडन करताना, मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते केके मिश्रा म्हणाले, आम्ही यात्रेदरम्यान अशी कोणतीही घोषणा दिली नाही किंवा ऐकली नाही. राहुल गांधींच्या समर्थनार्थ हजारो लोक येताना पाहून भाजपला पोटशूळ उठले आहे. याउलट संघ आणि भाजपची विचारधारा असलेल्या कुणाला तरी या षडयंत्रासाठी रॅलीत पाठवले गेले असावे, असा आरोप के के मिश्रा यांनी केला.
हे ही वाचा : ‘40 रेडे गुवाहाटीला जाणार, पण मी नाही कारण…’, गुलाबराव पाटलांची तुफान टोलेबाजी
‘तोडो इंडियाचे जनक असलेल्या घृणास्पद भाजपची विचारधारा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे आहे धास्तावली आहे. तसेच लोकेंद्र पाराशर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मिश्रा म्हणाले.