मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रामदेव बाबांचा ठाण्यात योग कार्यक्रम, चर्चा मात्र 'त्या' विधानाची...

रामदेव बाबांचा ठाण्यात योग कार्यक्रम, चर्चा मात्र 'त्या' विधानाची...

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 25 नोव्हेंबर : राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादग्रस्त व्यक्तव्यावरून घमासान सुरू आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्याने राज्यभरात त्यांच्याविरोधात तिव्र संतापाची लाट आहे. दरम्यान ही घटना ताजी असताना आता रामदेव बाबा यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यावरून आता राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.

ठाण्यातील हायलँड भागात पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने आज (दि.25) शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या. 

हे ही वाचा : शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याला गुलाबराव पाटलांची दांडी, यंदा...थेटच सांगितलं

या कार्यक्रमावेळी रामदेव बाबा महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.

पतंजलीच्या महिला महासंमेलनाला योगगुरू रामदेवबाबांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही घातले नाही तरी छान दिसतात, असं रामदेव बाबा म्हणाले. रामदेव बाबांच्या या वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : VIDEO : विज तोडाल तर रट्टे घालीन, संतोष बांगरांकडून पुन्हा शासकीय कर्मचाऱ्याला धमकी

मुख्य म्हणजे यावेळी अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वक्तव्य केले. तर या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंही उपस्थित होते.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात महिलासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली यामुळे राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अशातच आता योगगुरु रामदेव बाबा यांनीदेखील आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, तसेच राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांची प्रकरणे ताजी असतानाच रामदेव बाबा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

First published:

Tags: Amruta fadanvis, Baba ramdev, Cm eknath shinde, Thane, Thane (City/Town/Village)