अरे बापरे! थंडीपासून बचावासाठी 500 रुपयांच्या नोटा जाळल्या; पाहणारे तर चक्रावलेच!

अरे बापरे! थंडीपासून बचावासाठी 500 रुपयांच्या नोटा जाळल्या; पाहणारे तर चक्रावलेच!

केवळ 500 रुपयांच्या नोटाच नाही तर त्याने सोनं-चांदी देखील जाळलं.

  • Share this:

महोबा , 10 फेब्रुवारी: उत्तर प्रदेशमध्ये सध्या कडाक्याची थंडी पसरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी याठिकाणचे नागरिक शेकोट्या पेटवत आहेत. अशामध्ये उत्तरप्रदेशच्या महोबा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मानसिकरित्या आजारी असलेल्या एका व्यक्तीने थंडीपासून बचाव करण्यासाठी चक्क नोटा जाळल्या. या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे, 'त्याला खूप थंडी लागत होती अशामध्ये त्याने त्याच्याजवळ ज्या काही वस्तू होत्या त्या जाळल्या आणि थंडीपासून स्वत:चा बचाव केला.'

उत्तर प्रदेशच्या महोबा शहरामध्ये ही घटना घडली आहे. जुने भाजी मार्केट परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने थंडापासून बचाव करण्यासाठी 500 रुपयांच्या नोटांच्या गड्ड्या जाळल्या. ही व्यक्ती मानसिकरित्या आजारी असल्यामुळे त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेबाबत आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

हे ही वाचा-फडणवीसांच्या पुढाकारामुळे तीराला मोठी मदत;16 कोटींच्या इंजेक्शनसाठी आणखी एक पाऊल

महोबा परिसर बुंदेलखंडामध्ये येतो. याठिकाणी मोठ्याप्रमाणात गरीबी आहे. अशामध्ये जर कोणी थंडीपासून बचाव करण्यासाठी 500 रुपयांच्या नोटा जाळत असेल तर याची चर्चा होणारच. आजतक वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भाजी मार्केटजवळ असलेल्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये ही व्यक्ती कचरा टाकत असताना सफाई कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले होते. तेव्हा हे प्रकरण समोर आले.

या कचरा कुंडीमधून लाखो रुपयांच्या नोटा, एक-दोन मोबाईल आणि सोन्या-चादींचे दागिने जळालेल्या अवस्थेत सापडले. या व्यक्तीने या सर्व वस्तू थंडीपासून बचाव करण्यासाठी जाळल्या होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मौल्यवान वस्तू आणि लाखो रुपये जाळल्यानंतर तो मोठमोठ्याने हसत होता.

हे देखील वाचा - घृणास्पद प्रकार! 7 महिन्यांत 7 वेळा तरुणीला विकलं; आरोपींच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

पैसे आणि मौल्यवान वस्तू जाळल्यानंतर तो हे सुद्धा बोलत होता की, 'मला खूप थंडी लागत होती. त्यामुळे माझ्याजवळ ज्या काही वस्तू होत्या त्या मी जाळल्या आणि थंडीपासून माझे संरक्षण केले.' या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. आसपासच्या सर्व नागरिकांना आश्चर्य वाटत आहे की या व्यक्तीकडे ऐवढे पैसे आणि दागिने कुठून आले. याप्रकरणावर सध्या पोलिसांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.

Published by: Aditya Thube
First published: February 10, 2021, 8:50 AM IST

ताज्या बातम्या