रायपूर, 09 फेब्रुवारी: देशात महिला अत्याचाराचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका 18 वर्षीय युवतीला काही नराधमांनी 7 महिन्यात 7 वेळा विकल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या या अत्याचाराला कंटाळून या युवतीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. अपहरण करणाऱ्या आरोपींनी युवतीच्या कुटुंबियांना खंडणी मागितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. या घटनेचा तपास उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी छत्तीसगड राज्यातील जशपूर येथील रहिवाशी होती. तिच्या एका नातेवईकाने तिला नोकरी देण्याचं कारण सांगून मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात आणलं होतं. त्यानंतर याठिकाणाहून तिचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिला उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशात तब्बल सात वेळा विकलं होतं. त्यानंतर बबलू कुशवाहा नावाच्या एका मानसिक रोग्यासोबत तिचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं होतं. त्यामुळे संबंधित आरोपींच्या अत्याचाराला कंटाळलेल्या तरुणीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ललितपूर याठिकाणी आत्महत्या केली होती. पण खंडणी मागितल्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे. हे ही वाचा- डेबिट कार्डवरच पिन नंबर ठेवला होता लिहून, चोराच्या हाती पडली पर्स आणि… याप्रकरणी वरिष्ट पोलीस अधिकारी सचिन शर्मा यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचं नाव पंचम सिंह राय असं आहे. पीडित मुलीच्या दूरच्या नातेवाईकांच्या चौकशीत त्यांनी मुलीला जशपूरहून छतरपूर येथे आणल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर नातेवाईकांनी काही दिवसांनंतर, पीडित मुलीला छतरपूर येथील कल्लू रायकवार याला 20,000 रुपयांत विकलं होतं. तर या मुलीला विकत घेणारी शेवटची व्यक्ती संतोष कुशवाह होती. उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे राहणाऱ्या संतोष कुशवाहा याने तिला 70,000 रुपयांत विकत घेतलं होतं. यानंतर आरोपने मानसिकरीत्या वेडसर असलेला संतोषचा मुलगा बबलू कुशवाहा याच्याशी तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ललितपूरमध्ये आत्महत्या केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.